हिंगणघाट: सीमेंट रोड खोदून केल अतिक्रमन, नगरपालिका झोपेत, अधिकारी मजेत.
हिंगणघाट: सीमेंट रोड खोदून केल अतिक्रमन, नगरपालिका झोपेत, अधिकारी मजेत.

हिंगणघाट: सीमेंट रोड खोदून केल अतिक्रमन, नगरपालिका झोपेत, अधिकारी मजेत.

हिंगणघाट: सीमेंट रोड खोदून केल अतिक्रमन, नगरपालिका झोपेत, अधिकारी मजेत.
हिंगणघाट: सीमेंट रोड खोदून केल अतिक्रमन, नगरपालिका झोपेत, अधिकारी मजेत.

✒️मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒️
हिंगणघाट,दि.4 जुलै:- हिंगणघाट शहरातील जैनमंदीर वार्ड मधे नगर पलिकेने बांधलेले सीमेंट रोड खोदुन अतिक्रमन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिंगणघाट नगर पालिका प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नगर पालिकेने बांधलेला रोड खोडून अतिक्रमण कराना-या विरोधात काही लोकांनी तक्रार दाखल केली. पण या अतिक्रमण धारकासोबत चिरिमिरीचे व्यवहार झाल्याने नगर पालिका प्रशासन आणि अधिकारी हेतुपरस्परपर याकड़े दुर्लक्ष करीत आहे.

हिंगणघाट नगर पालिकेत कागदी पुराव्यानीशी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यात हिंगणघाट नगर पलिकेने बांधलेला आठ फुटाचा सिमेंट रोड फोडून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आणि आता हा आठ फुटाचा रोड तीन फुटाचा झाला आहे. यामध्ये भायाणी, पटेलिया आणि अग्रवाल चा सहभाग असल्याच्या तक्रारी आहे. तक्रार केल्यानंतर काही अधिकारी कारवाही करण्यास गेले असता, त्या वार्डातील नगर सेवकांनी आडकाठी आणल्याची देखील तक्रार आहे. याचा अर्थ पालिकेच्या अधिका-या सोबत स्थानिक नगर पलिकेचे नगरसेवक सुद्धा त्या अतिक्रमण धारकाचे मिंधे झाले असल्याचे दिसून येते. हिंगणघाट नगर पलिकेने बांधलेल्या सिमेंट रोडवर अतिक्रमन करणारे त्या रोडला आपल्या बापाची जमीन समजून अतिक्रमण करीत असल्याचे बोलले जात आहे.

नगररचनाकार यांची भूमिका संशयास्पद
हिंगणघाट नगर पालिकेत कार्यारत नगररचनाकार यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते. पालिकेत दोन रचनाकार आहे पण ते दोघे घट्ट मित्र असल्या सारखे एकमेकाच्या चुकिला पांघरुन घालून काम करीत असल्याचे चित्र आहे. कार्यालयात वेळेवर येत नसल्याचा अनेक लोकाच्या तक्रारी येत आहे. दहा वेळा येरझा-या मारल्यानंतर पण काम होत नाही अशी अनेक लोकांची ओरड आहे.

ले आऊट मधील भूखंड झाले श्रीखंड.
दिवसान दिवस जनसंख्या वाढ होत आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात लेआऊट पाडण्यात आले आहे. घर बांधण्यासाठी नगर पालिका प्रशासनाची परवानगी आवश्यक असल्याने नकाशा पास करणे आणि इतर परवानगी देने याला जानबुजुन वेळ लाव-या जात असल्याचे समोर येत आहे. विशेषतः ले आऊट च्या प्रकरणात ते दोघेही एकाच वेळी लक्ष घालतात. असं वाटतं की ते  पालीकेचा पगार मात्र ते वेगवेगळे घेतात. काम मात्र मिळून करतात. रोजगार हमी वर असणारे जसे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही करतात तसेच हे दोघे करतात अशी ओरड शहरातील नागरीकाची आहे.

हिंगणघाट नगर पालिकेच्या रोड फोडून अतिक्रमण प्रकरणी 2018 मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती. पण प्रकरणाची फाईल गायब झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात नगर सेवक दशरथ ठाकरे ने देखील झालेल्या भ्रष्ट कामा बद्दल तक्रार केली होती. पण त्यांनाही गप्प बसावे लागले. अश्या प्रकारे हे दोघे नगर रचनाकार आपले उखळ पांढरे करीत आहे. त्यांना याबद्दल जाब विचारल्यास आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही अशी मग्रुरीची भाषा करतात. कोणतेही काम घेऊन गेल्यास पैसाची मागणी केली जाते. आणि ले आऊट च्या कामात त्याना जास्त रुची दिसून येते. सामान्य माणूस गेल्यास त्याला येरझारा मारण्यास लावते. आणि काही चीरमीरी भेटली की काम होते. फोन केल्यास या असे म्हणणारे हे दोघेही कार्यालयात गेल्यावर गायब राहते. अश्या या भष्ट्र अधिकाऱ्या वर कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here