संकटाने खचलेल्या भोयर कुटुंबीयाच्या मदतीला धावले गोंडपीपरी पोलिस भोयर कुटुंबात जागवली जगण्याची नवी उम्मीद

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी तालूक्यात नांदगाव ( फुर्डी) येथील प्रदीप भोयर यांच्या घरावर विज कोसळुन लागलेल्या आगीत घरं जळून राख झालं अन्यधान्य ..कपडे… पेटीतील पैसे तीस हजार रोख रक्कम ..खत … शेतीचे अवजारे.. संसार उपयोगी सर्व जळुन राख झाले.अंदाजे पाच लाख पन्नास हजार चे नुकसान झाले भोयर कुटूंबावर मोठ संकट कोसळलं संकटात खचून न जाता नव्या उमेदीने जगता यावे यासाठी गोंडपीपरी पोलिस विभाग भोयर कुटुंबीयाच्या पाठी मागे राहिले शासनाची मदत पोहचण्यापुर्वी गोंडपीपरी पोलिस आज दिनांक ३ जुलै रोज शनीवारला भोयर कुटूंबाला एक हात मदतीचा या भावनेतून दहा हजार रोख रक्कम देण्यात आली व अन्न धान्य कीट देउ केली
समाजात वावरताना आपलंही काही देन लागतं या भावनेतून सामाजिक दायित्व जोपासत गोंडपीपरी पोलिस विभागाने संकटात सापडला भोयर कुटूंबाला मदतीच्या हात दिला गोंडपीपरी पोलिस स्टेशन चे कर्तव्यशील ठाणेदार संदीप धोबे यांनी भेट घेतली भोयर कुटूंबीयाची विचारपूस केली आलेल्या संकटाला खचून न जाता हार न मानता संकटाचा सामना करावा असे सांगत भोयर कुटुंबीयाच्या सांत्वन केलं
या वेळी गोंडपीपरी चे ठाणेदार संदीप धोबे ..गोंडपीपरी पोलिस शंकर मन्ने .. पोलिस कर्मचारी गणेश पोदाडी ..अमीत गूरणूले सह … नांदगाव फुर्डी चे पोलिस पाटील सौ विभाताई खामणकार उपस्थित होते
शासकीय मदत पोहोचण्यापूर्वी च संकटात सापडलेल्या भोयर कुठुंबीयाला मदतीच्या हात देऊन माणवतेचे दर्शन घडवून दिल्याने गोंडपीपरी पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here