वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पॉवरच्या कर्मचाऱ्यांना मारहाण एका कर्मचाऱ्याचा मृत्यू.

अभिजीत सकपाळ✒
भिवंडी, ठाणे प्रतिनिधी
📲9960096076📲

भिवंडी,दि.4 जुलै:- मुंबईच्या भिवंडी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शन यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या शिवीगाळ व धक्काबुक्की तसेच मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाउंड येथे घडली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तुकाराम पवार वय 55 वर्ष, राह. काटेमानीवली कल्याण असे जमावाच्या मारहाण व धक्काबुक्कीत मृत्यू झालेल्या टोरंट पावर कर्मचाऱ्याचे नाव असून ते टोरंट पावरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी काटई गावातील घरत कंपाउंड येथे वीज चोरी व थकीत वीज मीटरवर कारवाई करण्यासाठी टोरंट पावरचे कर्मचारी गेले असता येथील स्थानिक नागरिकांनी टोरंटच्या या कारवाईस विरोध केला व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की , मारहाण केली . या मारहाणीत टोरंटचे सुरक्षा रक्षक तुकाराम पवार यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले होते मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here