यवतमाळ जिल्हात बस-ट्रकच्या अपघात 16 प्रवासी जखमी, दोघाची परस्थिती गंभीर
यवतमाळ जिल्हात बस-ट्रकच्या अपघात 16 प्रवासी जखमी, दोघाची परस्थिती गंभीर

यवतमाळ जिल्हात बस-ट्रकच्या अपघात 16 प्रवासी जखमी, दोघाची परस्थिती गंभीर

यवतमाळ जिल्हात बस-ट्रकच्या अपघात 16 प्रवासी जखमी, दोघाची परस्थिती गंभीर
यवतमाळ जिल्हात बस-ट्रकच्या अपघात 16 प्रवासी जखमी, दोघाची परस्थिती गंभीर

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मो. नंबर
यवतमाळ,दि.4 जुलै:- यवतमाळ जिल्हातील एक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूर ते तुळजापूर या महामार्गावर यवतमाळ ते आर्णी रोडवर भरधाव राज्य महामंडळाची बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसचालकासह 16 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघा जनाची परस्थिती गंभीर आहेत. हा अपघात आज शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास किन्ही फाट्याजवळ झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथोमचार करून जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दारव्हा येथून निघालेली बस क्रमांक-एमएच 40-एन-8078 ही 21 प्रवासी घेऊन आर्णीकडे येत होती. त्याचवेळी कुर्डुवाडी (जि. पुणे) येथून डाळिंब घेऊन नागपूरकडे जाणार्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच 45-एटी-4573) बसला जबर धडक दिली. त्यात बसचालकासह 16 प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन जण गंभीर असून, त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेची माहीती मिळताच आर्णी पोलिस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. दरम्यान, बसचे वाहक विनोद मिरासे यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आयशर ट्रकचा चालक अजित महादेव भनूर (रा. कदमवाडी ता. मिरज जि. सांगली) याला आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
अपघातातील जखमींची नावे :
बसचालक रमेश रामचंद्र बुचके (वय 50, रा. दारव्हा), प्रवासी आनंद गोपाल रामटेके (वय 71, रा. लोणी), दिव्यांश किरण रामटेके (वय 4, रा. लोणी), सुशीला भिमप्रकाश मुजमुले (वय 32, रा. जवळा), अनिता गजानन जाधव (वय 45, रा. वळसा ता. दारव्हा), विमल खुशाल मुजमुले (वय 70, रा. जवळा), नम्रता युवराज डोळस (वय 22, रा. महागाव), विष्णू गोरखनाथ इंगोले (रा. महागाव), अंकीत राजेश चांडक (वय 28, रा. आर्णी), ज्योती बाळू राठोड (वय 32, रा. वडगाव गाडवे), नयना बाळू राठोड (वय 5, रा. वडगाव), अनूसया विष्णू इंगोले (वय 55, रा. महागाव), विलास शंकर काळे (वय 40, रा. जवळा), विठ्ठल कुरपाजी पिंपळकर (वय 63, रा. तरनोळी), नागोराव भिकाजी जगताप (वय 65) व बसचे वाहक विनोद मिरासे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here