भारतीय नौसेने तर्फे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांना मानवंदना

भारतीय नौसेने तर्फे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांना मानवंदना

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या २९६ व्या पुण्यतिथी दिनी सरखेल रघुजीराजे आंग्रे यांच्या “गाज फाऊंडेशन” द्वारे आयोजित कार्यक्रमात भारतीय नौसेने तर्फे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांना मानवंदना देण्यात आली. त्या प्रसंगी कमांडींग ऑफिसर INS आंग्रे, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड, रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी, माजी नगराध्यक्ष श्री प्रशांत नाईक, माजी उप नगराध्यक्ष सौ मानसी म्हात्रे, शहरातील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड च्या कम्युनिटी हॉल मध्ये गाज फाउंडेशन च्या माध्यमातून आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड च्या सक्रिय सहयोगाने परिसरातील दहावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी *”Pathways To Service”* या नावाने मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड चे कार्यकारी संचालक श्री नितीन हिरडे आणि महाव्यवस्थापक संजीव हरळीकर उपस्थित होते.
भारतीय नौसेनेतील करिअरच्या संधी संबंधी मार्गदर्शन शिबिरात भारतीय नौसेना पोत आंग्रे चे कमांडिंग ऑफिसर कमोडोर दीपक सिंघल तसेच त्यांचे कमांडर मगर यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी होती. यामुळे अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांना नौसेनेतील भविष्यकालीन संधी संबंधित उत्तम मार्गदर्शन झाले. सदर कार्यक्रमासाठी गाज फाउंडेशनचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, उपाध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले, श्री अभिजीत आयरे, इतर सर्व ट्रस्टी, परिसरातील विविध शाळांचे शिक्षक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सागरी सीमा मंच, जे एस एम महाविद्यालयातील एन.सी.सी. पथक यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमात परिसरातील 927 हून अधिक विद्यार्थी आणि ४५ शिक्षकांचा सहभाग लाभला. यापुढे देखील गाज फाउंडेशनच्या वतीने असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पावसाळा संपल्या नंतर सैन्य दल , नौसेना आणि वायुसेना असे तिन्ही सेना दलांसाठी एकत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती गाज फाऊंडेशन चे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली.