दिल्ली पुन्हा बलात्कार आणि हत्याने हादरली! पुजाऱ्याने केला नऊ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पुजाऱ्यानेच केला अंत्यसंस्कार.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
नवी दिल्ली,दि.3 ऑगस्ट:- भारताच्या राजधानी मधून एक खळबळजनक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. त्यामुळे आज भारत देशात कुठेही महिला सुरक्षित नाही. दररोज देशात रोज कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. दिल्लीत एका नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत तर आरोपींनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. सोबतच पोलिसांना याबद्दल कळवू नका, अन्यथा प्रकरण अजून गुंतागुंतीचं होईल असंही त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास स्मशानभूमीत असणाऱ्या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घऱाबाहेर पडली होती. पण घऱातून बाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. जवळपास सहाच्या सुमारास स्मशानमभूमीतील पुजारी आणि पीडितेच्या आईच्या ओळखीतल्या काही जणांनी फोन करुन त्यांना बोलावलं आणि मृतदेह दाखवला.

वॉटर कूलरमधून पाणी पित असताना विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला असे त्यांनी पीडितेच्या आईला सांगितलं. पीडितेच्या हातावर जखमा होत्या तसंच तिचे ओठ निळे पडले होते असंही पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर त्या पुजारी आणि इतर आरोपींनी मुलीच्या आईला पोलिसांना फोन करु नका, नाहीतर यामुळे गुन्हा दाखल होईल आणि पोस्टमॉर्टम करत तिच्या अवयवांची चोरी होईल असे सांगत घाबरवले. यानंतर महिलेची संमती नसतानाही पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिलेने तात्काळ आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर जवळपास 200 लोक स्मशानभूमीजवळ जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे. क्राइम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन पुरावे जमा केले असून याप्रकरणी तपास सुरु आहे.