जिल्हाधिकारी चव्हाण यांची अनपेक्षित गंगापूर तहसील कार्यालयास भेट* *सुंदर माझे कार्यालय अंतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या केल्या सूचना*

*जिल्हाधिकारी चव्हाण यांची अनपेक्षित गंगापूर तहसील कार्यालयास भेट*

*सुंदर माझे कार्यालय अंतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या केल्या सूचना*

जिल्हाधिकारी चव्हाण यांची अनपेक्षित गंगापूर तहसील कार्यालयास भेट* *सुंदर माझे कार्यालय अंतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या केल्या सूचना*
जिल्हाधिकारी चव्हाण यांची अनपेक्षित गंगापूर तहसील कार्यालयास भेट*
*सुंदर माझे कार्यालय अंतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या केल्या सूचना*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

औरंगाबाद : – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सकाळी अचानक व अनपेक्षितरित्या
गंगापूर तहसील कार्यालयास भेट दिली.
भेटी दरम्यान वेळेवर उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद घेण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी परिसर स्वच्छ करणे, झाडांची निगा राखणे, खिडक्यांना पडदे लावणे, दस्तऐवज व्यवस्थतीत ठेवणे व सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. यापुढेही अनपेक्षितरित्या पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कमीत कमी तीन झाडे लावली व ती जगवलीच पाहिजे असे म्हणत वृक्षरोपण व संवर्धन वर त्यांनी भरदेण्याचे आवाहन केले.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.ठाकूर यांना महिलांसाठी सुलभ शौचालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, तहसीलदार सारिका शिंदे यांची उपस्थिती होती.