आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतले भेट!
पुरपीडितांना नुकसान भरपाई व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची निवेदनातून केले मागणी
*स्वप्निल श्रीरामवार*
*अहेरी*तालुका प्रतिनिधि*
मो न 8806516351
– गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा तथा अहेरी विधानसभेत पाण्याचा व पुराचा मोठा फटका बसला. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सोमवार 1 आगष्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरपीडितांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी निवेदन सोपविले व सविस्तर चर्चाही केले.
या आधी जिल्ह्यातील पुरपरिस्थितीच्या वाताहातची पाहणी व शेतकऱ्यांची आणि पीडितांची व्यथा जाणून घेण्याकरिता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी आग्रह व साकडे घातले होते. त्याचीच परिणीती म्हणून अजित दादा पवार 28 जुलै रोजी जिल्ह्याचा दौरा करून पूरपरिस्थितीच्या नुकसानाची पाहणी व अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेऊन मदतीच्या दिशेने हालचालीचे चक्र फिरविले.
विशेष म्हणजे पूर असतांना स्वतः आमदार धर्मराव बाबा आत्राम “फिल्ड”वर उतरून नागरिकांच्या आणि पुरपीडितांच्या मदतीकरिता धावले होते. गोर-गरिबांना आर्थिक मदत करून असंख्य ठिकाणी तात्पुरते वास्तव्य व भोजनाची व्यवस्थाही केले होते.
त्या नंतर लगेचच गत 20 जुलै बुधवार रोजी कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार यांच्यासमवेत जिल्ह्याचा दौरा करून जीवनावश्यक साहित्याचे वितरण आणि आर्थिक पुरवठाही केले.
यंदाच्या अतिवृष्टीमुळे असंख्य कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाल्याने आणि हवालदिल शेतकरी संकटाच्या खाईत असल्याने योग्य ती सरसकट नुकसान भरपाई व मोबदला तात्काळ मिळावे या मागणीच्या पाठपुरावा करिता आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी राज्याचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सोपविले.