भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या “प्रदेश सहसयोंजक” पदी फा. जितेंद्र जैन यांची स्तुत्य निवड

भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या “प्रदेश सहसयोंजक” पदी फा. जितेंद्र जैन यांची स्तुत्य निवड

भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या "प्रदेश सहसयोंजक" पदी फा. जितेंद्र जैन यांची स्तुत्य निवड
तन्मय सुनिल जैन
7588165274
सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव : – भाजपा पक्ष संघटनेच्या माध्यमातून वैदयकीय क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कार्यतत्पर राहणारे धुळे येथील फा.श्री जितेंद्र जैन यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश सहसंयोजक पदी मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात स्तुत्य निवड करण्यात आली आहे..
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संमतीने,भाजपा महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपचडे साहेब,भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सहमंत्री मा.भरत राऊत व भाजपा वैद्यकीय आघाडी फार्मसी विभागाचे प्रदेश सयोंजक फा.राकेश जैन नहार यांच्या हस्ते *फार्मसिस्ट जितेंद्र जैन बंब* यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या फार्मसी विभागाच्या *”प्रदेश सहसयोंजक”* पदी स्तुत्य निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारतीताई पवार, मा.केंद्रीय रक्षामंत्री राज्यमंत्री खा.डॉ.सुभाष भामरे , मा.अन्न व औषध मंत्री,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. जयकुमार रावल, खा.डॉ.हिनाताई गावित,आ.प्रशांत बंब,आ.अमरिशभाई पटेल, आ.कांशीराम पावरा,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष मा. नारायण पाटील, भाजपा धुळे जिल्हा शहरध्यक्ष मा. अनुप अग्रवाल,डॉ.माधुरी बोरसे-बाफना,केमिस्ट जेष्ठ नेता मा.विनयभाई श्राफ, फार्मसिस्ट नेता सचिन भालेकर,अजय सोनी, विलास कोठावदे,आण्णासाहेब चौधरी यांच्यासहित अनेक फार्मसिस्ट, भाजपा पदधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.
गेली अनेक वर्ष जैन यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमाने सामाजिक, राजकीय व फार्मासिस्टाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करीत आहेत. तसेच त्यांना फार्मासिस्टच्या विविध समस्या व प्रश्न अवगत आहेत.भारतीय जनता पार्टीच्या विचारांना व ध्येय धोरणांना व्यापक प्रसिद्धी देऊन सर्व समान्यपर्यंत विचार पोहचविण्याचा कामला ते सदैव तत्पर असतात,जैन यांनी फार्मासिस्टासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांनी पक्षाच्या विविध जबाबदारी सभाळल्या आहेत,व संभाळत आहेत,जैन ही जबाबदारी यशस्वीरित्या संभाळतील असा विश्वास पक्षाला आहे.