अहेरी तालुक्यातील कीष्ठापूर-कोत्तागुडम ते पत्तीगाव गावात जाणारा मार्ग चिखलमय

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो: 9405720593

गावकऱ्यांची दुर्दशा तात्काळ रस्त्याचे खडीकरण दुरुस्ती करा अन्यथा धान रोवण्याचे रोपवन कार्यक्रम करून यातून मिळणारा उत्पादन महाराष्ट्र शासनाला दान करणार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी आवाहन केले

अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुका अहेरी येथील किष्ठापूर पत्तीगाव रस्त्याची दुर्दशा अतिशय खराब अवस्थेत असल्याने वाहन चालकांना चिखलाच्या त्रास सहन करावे लागत आहे त्याचप्रमाणे येथील रहिवासी यांना चिखलातून प्रवास करावे लागत आहे शाळेचे विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्याकरिता अधिक परिश्रम घ्यावे लागत आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष संबंधित अधिकारी वर्ग या विषयाबाबत बोलण्यास तयार नाही कोणी कोणाचे वाली नाही या रस्त्याचे खडीकरण करणे व रस्त्याचे मजबुतीकरण करून या भागातील लोकांना सुविधा देणे आवश्यक असताना सुद्धा लोकप्रतिनिधी असो किंवा शासन लोकांना सुख सुविधा देण्यास अपयश ठरले असे स्पष्ट दिसून येते.

एकीकडे राज्य शासनाने शासन आपल्या दारी असा उपक्रम राबवित असल्याचे दिंडोरी वाजवत आहे परंतु शासनाचा हा उपक्रम खोकला खोकला आणि कागदावरच राबवीत आहे शासन आपल्या दारी नसून जनता शासनाचे दारिदारी भटकत आहे असे म्हटले तरी काही हरकत नाही मागील एक वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जनतेने आपली समस्या कोणापुढे मांडावी असा गंभीर प्रश्न लोकांसमोर आला आहे.

कीष्ठापूर पत्तीगाव रस्त्याचे चिखलमय झालेल्या रस्त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीन असल्याचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी शासनाला आव्हान केले शासनाचे व अधिकारी वर्गांचे डोऴे उघडण्यासाठी लोकशाही पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने असे अनेक जनहितार्थ समस्या बाबत शिवसेना अहेरी विधानसभा क्षेत्रात खोल खोल कार्यक्रम आंदोलनाच्या मार्गाने आंदोलन उभारणार जनसेवा हीच ईश्वर सेवा याच भावनाने शिवसेना नेहमी लोकांचे समस्या सोडवण्यासाठी कार्य करीत असते आज अहेरी विधानसभा क्षेत्रात असे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न या विभागात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने शासन प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी आंदोलन हाच एक मार्ग असल्याचे रियाज शेख यांनी आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here