विद्याभवनने पटकवले स्वच्छता पारितोषिक

57

विद्याभवनने पटकवले स्वच्छता पारितोषिक

नेरुळ: पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाने नवी मुंबई महानगरपालिका आयोजित स्वच्छ शाळा स्पर्धेत विभागीय गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकवले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्ञानकेंद्र मुख्यालयात आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात अकरा हजार रुपये बक्षीस रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेले हे पारितोषिक अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. अजय गडदे, उपायुक्त स्मिता काळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक मिलिंद अंबेकर यांच्या हस्ते संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ तसेच सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिपाई दिपक भांडारकर यांना प्रदान करण्यात आले.

 

नवी मुंबई महानगरपालिका आयोजित स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती.

स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा – महाविद्यालय, स्वच्छ मार्केट, स्वच्छ रूग्णालय, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय’ अशा विविध घटकांचा समावेश या स्पर्धेत होता. विभाग स्तरावर उत्तम कामगिरी करणा-या संस्थांचा स्वच्छता स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात गौरव करण्यात आला. 

या सन्मानप्रसंगी कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर मनिषा मुळिक , गोरख कदम, समन्वयक पांडुरंग मुळिक शिक्षक अविनाश कुलकर्णी व स्वच्छता सैनिक दिपक भांडारकर उपस्थित होते. विद्या भवनच्या पालकांनी शाळेचे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.