शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर कोरोनाचे विरजण (सावट)
शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर कोरोनाचे विरजण (सावट)

शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर कोरोनाचे विरजण (सावट)

शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर कोरोनाचे विरजण (सावट)
शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर कोरोनाचे विरजण (सावट)

अमोल थूल
राळेगाव तालुका प्रतिनिधी
मो. 9130494209
राळेगाव : –
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,आपल्या रक्ताच पाणी करून शेतधनी सोबत राबणारा मुका जीव म्हणजे बैल, संकटकाळी आपल्या धन्याला हिम्मत देणारा, व एका दाण्याचे हजार दाणे बनविण्यासाठी झिजनारा जीव म्हणजे बैल, ऊन, वारा, पाऊस, दुःख, वेदना, यातना सहन करून एक शब्दही न बोलता सहन करणारा जीव म्हणजे बैल,मागच्या वर्षी सर्वसामान्य जनतेचे कोरोनाचे नावावर कंबरडे मोडणाऱ्या व्यवस्थेतून मानवजात सावरत असताना शेतकरी, कष्टकरी वर्ग पोळा या सणावर कोरोनाने विरजण पाडल्याची चर्चा गावागावात होत आहे.

शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर सातत्याने कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी अनेक संकटे पाहावयास मिळतात. तर यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे पोळावर संकट आले आहे.  शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.

गावच्या चौकात गावातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येवून एकमेकांना आलींगन देत गळा भेट घेतात. बैलांची पूजा व झळत्या म्हणून बैलांचे लग्न लागायचे. परंतु कोरोनामुळे पोळावर सुद्धा विरजन पडले. कोरोणामुळे शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाले. रोजगार संपले व हाताला काय नाही तर पैसा कुठून येणार.

पोळानिमित्त बाजारपेठा सजल्या असल्या तरिही शेतकरी रिकामा असल्याने आपल्या सर्जा-राजासाठी काही घेऊही शकत नाही. बाजारातील साहित्ये विक्रेते सुद्धा चिंतेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा सामूहिक पोळा भरणार नाही यामुळेही शेतकरी निरुत्साही आहे. कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसणाºया सर्जा-राजाचा पोळा यंदा मंगळवारी आहे. वर्षभर राबराब राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा असतो.

एक दिवस आधी बैलांना आंघोळ करुन त्याची पूजा करुन पिठाचे लाडू खायला दिले जाते त्याला मोहबैल असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी बैलांना सजवून त्याची ओवाळणी करुन मनोभावे पूजा केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला जसा फटका बसला तसाच किंबहूना सर्वाधिक फटकाही शेतीला बसला आहे. कोरोनामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यात शेतकरी देखील अपवाद नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here