गडचिरोली शासनाचे निवास स्थानावरील लाखो रुपये पाण्यात; वनविभागाची अनेक निवासे वनाधिकारी व कर्मचारीविना जीर्णावस्थेत

अमोल रामटेके
अहेरी तालुका प्रतिनिधी
9405853535
गडचिरोली:-
अहेरी तालुक्यातील कोलामार्ग अभयारण्याअंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली स्थित प्राणहिता वनपरिक्षेत्र व कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयीन कर्मचा-यांसाठी उभारण्यात आलेली अनेक निवासस्थाने कर्मचा-यांच्या मुख्यालयी न राहण्यामुळे जीर्णावस्थेत आली आहेत. परिणामी शासनाने या निवासस्थानावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात जात असल्याचा आरोप जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.

वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी राहून वनंसपदेचे संरक्षण करावे या स्तुत्य हेतूने कर्मचा-यांकरिता शासनाद्वारे लाखो रुपये खर्ची घालून निवासस्थाने उभारण्यात येतात. मात्र प्राणहिता वनपरिक्षेत्र व कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ अधिका-यांसह वनकर्मचारी मुख्यालयी न राहता तालुकास्थळावरुन ये-जा करीत सेवा देत आहेत. परिणामी या वनक्षेत्रातील वनसंपतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कर्मचा-यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी याकरिता वनविभागाद्वारे प्रशस्त अशी निवासस्थानेही उभारण्यात आली. मात्र या निवासस्थानी कर्मचारी न राहत नसल्याने या इमारतींची दैनावस्था झाली आहे. अनेक इमारती देखभालीअभावी मोडक्या अवस्थेत आली आहे. अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता विविध भत्यांची उचल करीत असतांना याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनीही कानाडोळा आहे. त्यामुळे मुख्यालयाला खो देणा-या या वनकर्मचा-यांना सक्तीची कारवाई करावी, अशीही मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.

गडचिरोली शासनाचे निवास स्थानावरील लाखो रुपये पाण्यात; वनविभागाची अनेक निवासे वनाधिकारी व कर्मचारीविना जीर्णावस्थेत

देखभाल दुरुस्तीवरही मोठा खर्च
वनअधिका-यांसह कर्मचारी मुख्यालयातील या निवासस्थानी राहत नसल्याने अनेक इमारतींची दैनावस्था झाली आहे. अनेक इमारती मोडक्या अवस्थेत आहेत. वनअधिकारी व वनकर्मचा-यांसाठी उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या देखभालीवरही शासन दरवर्षी मोठा खर्च करीत आहे. इमारतींवर एवढा खर्च होत असतांना कर्मचा-यांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती का केली जात नाही, असाही प्रश्न ताटीकोंडावार यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here