Govarit Mahila Janajagruti Sabha through Ambuja Cement Foundation
Govarit Mahila Janajagruti Sabha through Ambuja Cement Foundation

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन मृतकांच्या कुटुंबियांना मदत करा: आ.धर्मराव बाबा आत्राम

मृतकांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे वनाधिकाऱ्यांना निर्देश दिले, बिबट्याचा बंदोबस्त करण्याचेही सूचना केले

Govarit Mahila Janajagruti Sabha through Ambuja Cement Foundation

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन मृतकांच्या कुटुंबियांना मदत करा: आ.धर्मराव बाबा आत्राम

संतोष सल्लावार
अहेरी शहर प्रतिनिधी
8390031122

अहेरी:- मूलचेरा तालुक्यातील लगाम नजीकच्या येल्ला येथील मुत्ता रामा टेकुलवार यांच्यावर त्यांच्याच शेताच्या विहिरीजवळ शुक्रवारी बिबट्याने हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून मृतकांच्या कुटुंबियांना तूर्तास मदत व बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे वनअधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मुत्ता रामा टेकुलवार हे घरचे कमावते होते त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले (सुरेश व महेश) असून बिबट्याच्या हल्ल्यात घरच्या कमावता इसमाचे जीव गेल्याने शासनस्तरावर मदतीसाठी पाठपुरावा करून सानुग्रह मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.

बिबट्याच्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये व परिसरातील नागरिकांची दहशत दूर व्हावी याकरिता तात्काळ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी योग्य पाऊल उचलण्यात यावे असे सूचनाही आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here