आमदार सहसराम कोरोटे बिरसा फायटर्स संघटनेत विदर्भ उपाध्यक्ष म्हणून निवड
आमदार सहसराम कोरोटे बिरसा फायटर्स संघटनेत विदर्भ उपाध्यक्ष म्हणून निवड

आमदार सहसराम कोरोटे बिरसा फायटर्स संघटनेत विदर्भ उपाध्यक्ष म्हणून निवड

आमदार सहसराम कोरोटे बिरसा फायटर्स संघटनेत विदर्भ उपाध्यक्ष म्हणून निवड
आमदार सहसराम कोरोटे बिरसा फायटर्स संघटनेत विदर्भ उपाध्यक्ष म्हणून निवड

निखिल पिदूरकर  ✒
कोरपना तालुका प्रतिनिधी
9067769906
गोंदिया :- आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सहसराम कोरोटे हे बिरसा फायटर्स संघटनेत आले आहेत. त्यांची बिरसा फायटर्सच्या विदर्भ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28/08/2021 रोजी ऑनलाईन सभेत राज्य पदाधिकारी व विदर्भ प्रमुख यांच्याशी चर्चा करून आमदार सहसराम कोरोटे यांची विदर्भ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ऑनलाईन, वाॅटसप व फोनद्वारे चर्चेत राज्याच्या मुख्य पदाधिकारी व विदर्भ पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रमुख यांच्या सोबतच आमदार सहसराम कोरोटे सामाजिक कार्य करत असतात. सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी आमदार सहसराम कोरोटे यांचे नाव विदर्भ उपाध्यक्ष पदासाठी सुचवले आणि सर्वांच्या सहमतीने आमदार सहसराम कोरोटे यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या विदर्भ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.आमदार सहसराम कोरोटे हे आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. ते काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सामाजिक कार्यात सुद्धा ते नेहमी अग्रेसर असतात. अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

बिरसा फायटर्स संघटनेच्या कार्यांनी ते प्रभावित झाले व सुशीलकुमार पावरा, सुरेशकुमार पंधरे इत्यादी बिरसा फायटर्सच्या कार्यकर्त्यांसोबत आपल्याला काम करायला आवडेल.बिरसा फायटर्स संघटना आदिवासी समाजाच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी खूप जोरदार कामे करत आहे.मलाही युवा कार्यकर्त्यांसोबत काम करायला नक्कीच आवडेल. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित विदर्भ उपाध्यक्ष आमदार सहसराम कोरोटे बिरसा फायटर्स यांनी व्यक्त केली आहे.

आमदार सहसराम कोरोटे यांची बिरसा फायटर्स विदर्भ उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष राजेश धुर्वे, महासचिव राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी, संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष, प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख, गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार, जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे, राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग अध्यक्ष,सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विदर्भातील बिरसा फायटर्स शाखा पदाधिकारी यांनी सुद्धा आमदार सहसराम कोरोटे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांनी पोस्टर्स बनवून आमदार यांचे सोशल मिडियावर अभिनंदन केले आहे. तसेच बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने विशेष पोस्टर्स बनवून आमदार सहसराम कोरोटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आमदार सहसराम कोरोटे यांची बिरसा फायटर्स विदर्भ उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देणा-या सर्व आदिवासी बांधवांचे आमदार सहसराम कोरोटे यांनी आभार मानले आहेत.लोकप्रतिनिधी बिरसा फायटर्स संघटनेत आल्यामुळे बिरसा फायटर्स संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here