वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा यांच्या मार्फत जबरानज्योत शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन बैठक संपन्न.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

पोंभुर्णा :- पोंभुर्णा तालुक्यातील जबरानज्योत शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून जमिनींचे स्थाई पट्टे देण्यात तत्कालीन युती सरकार व आताचे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतात ज्योत (मशागत) करुनही त्यांना सरकार पट्टे देत नसल्याने जबरानज्योत शेतकऱ्यांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ समन्वयक राजुभाऊ झोडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांनी या बाबत राजु भाऊ झोडे यांना माहिती दिली व आज बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. बैठक राजराजेश्वर मंदिर सामाजिक सभागृह पोंभुर्णा येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ समन्वयक राजुभाऊ झोडे, जिल्हा उपाध्यक्ष श्यामभाऊ गेडाम, तालुकाध्यक्ष चंद्रहास उराडे,तालुका महासचिव रविभाऊ तेलसे,शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे, युवा तालुका अध्यक्ष अतुल वाकडे,तालुका उपाध्यक्ष मंगल लाकडे, आयटि सेल जिल्हा प्रमुख अविनाश वाळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जबरान ज्योत शेतकऱ्यांनी आपली आपबिती राजुभाऊ झोडे यांना सांगितले. गोर गरीब आदिवासी, गैर आदिवासी वंचित घटकांना पट्टे मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची हमी राजुभाऊ झोड़े यांनी उपस्थित जबराणज्योत शेतकऱ्यांना दिली. सदर बैठकीत पोंभुर्णा तालुक्यातील बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजुभाऊ दुर्गे, अमित निमसरकार, संतोष तेलसे, प्रशांत गोवर्धन, जितेंद्र मानकर, पराग उराडे, अजय उराडे, सुबोध उराडे, बालाजी मेश्राम, युनिल मानकर, प्रशिक मानकर, निश्चल भसारकर इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here