बलात्कार प्रकरणी सावनेरच्या दोन युवकांना अटक, पाच दिवसाची पोलीस कोठडी.
झुम्बा डान्स क्लासच्या नावावर शिक्षकाचे घृणास्पद कृत्य. दुसऱ्याने केला धमकी देऊन बलात्कार.
अनिल अडकिने
सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.क्र.9822724136
सावनेर-03 सप्टेंबर 2021:- स्थानिक बस स्थानक परिसरातील झुम्बा डान्स अकॅडमीत नृत्य शिकविण्याच्या नावावर पीडित विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याचे दुसऱ्या व्यक्तीस याबाबत माहीत झाल्याने त्याने घरी नाव सांगण्याची धमकी देऊन त्याच पीडितेवर निर्जनस्थळी बलात्कार केल्याची घटना सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. शुभम दौलत नारेकर वय 27 वर्ष रा.वार्ड क्र.10 होळी चौक सिताराम महाराज मठ परिसर, निखिल नीळकंठ भगत वय 36 वर्ष रा.होळी चौक परिसर सावनेर असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शुभम दौलत नारेकर हा बस स्थानक परिसरात झुंबा नृत्य क्लास चालवत असून त्याच्याकडे अनेक तरुणी नृत्य शिकण्यास येत होत्या तर अनेक महिला या आपला लठ्ठपणा कमी करण्याकरिता झुंबा नृत्य शिकण्यासाठी येत होत्या.शुभम याने नृत्य शिकवण्याच्या निमित्ताने पीडित तरुणीशी जवळीक साधत तिला आपल्या जाळ्यात ओढले व पीडितेस त्याने आपल्या घरी बोलावून बेडरूम मध्ये नेऊन जबरदस्तीने तिच्याशी मागील एक वर्षापासून तीन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले व ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.यासंबंधी त्याच परिसरात राहात असलेल्या आरोपी क्र.2 निखिल नीळकंठ भगत यास माहीत झाल्याने त्याने पीडितेस वारंवार फोन करुन धमकी देत खापा हायवे येथे बोलाविले व संबंधित घडलेली बाब घरी न सांगण्याची धमकी देत मिठी मारली व किस घेत तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेस पुन्हा त्याच ठिकाणी बोलावून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.फिर्यादीच्या तक्रारीवर सावनेर पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध अप.क्र.531/2021 भादवि 376,376 (2) (एन) 345,354 (ड) 504,507,34 गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
आज दोन्ही आरोपींना सावनेर येथील आर.बी.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाद्वारे आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.