वीज कंपनीच्या यांत्रिकावर रोखले पिस्तुल!

वीज कंपनीच्या यांत्रिकावर रोखले पिस्तुल!

वीज कंपनीच्या यांत्रिकावर रोखले पिस्तुल!

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

वरोडा, 4 सप्टेंबर
वीज वितरण कंपनी वरोडा शहर ‘सबस्टेशन’मध्ये कर्तव्यावर असणार्‍या यांत्रिकावर कंपनीच्या आवारात सीआरपीएफच्या जवानाने मारहाण करीत सोबत आणलेले पिस्तुल रोखून धमकी दिली. ही घटना शनिवारला रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली
वरोडा शहर वीज वितरण कंपनीच्या बोर्डा कार्यालय परिसरात 33 व 11 केव्ही सबस्टेशन आहे. शनिवारी प्रवीण सावे यंत्रचालक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना, रात्री 10 वाजताच्या सुमारास नंदुरी फिडर ट्रिप झाल्याने काही वेळा करता त्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ही माहिती सावे यांनी वरिष्ठांना दिली व विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सब स्टेशनमध्ये करीत असताना त्यांना एक भ्रमणध्वनी आला. त्यावर विद्युत पुरवठा केव्हा सुरू होणार म्हणून एक व्यक्ती बाचाबाची करू लागला. त्यानंतर काही अवधित वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला.
काही वेळातच तो व्यक्ती तिथे आला आणि सावे यांना मारहाण करणे सुरू केले. त्यावेळी सुरक्षारक्षक जवळ आला असता त्या व्यक्तीने सुरक्षारक्षकाला निघून जाण्यास सांगितले व सावे याला मारहाण केल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतः जवळील रिवाल्वर काढत त्यांच्यावर रोखून धरली. ही बाब अन्य कर्मचार्‍यांनी वरिष्ठांना कळविली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन त्या व्यक्तीस वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. स्वप्निल ढोरे असे नाव असलेला तो व्यक्ती केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असून, वरोड्यातील पद्मालय नगर परिसर येथील रहिवासी आहे. तो रजेवर आला असल्याचे समजते. सावे यांच्या तक्रारीवरून स्वप्निल ढोरे याच्याविरुध्द वरोडा पोलिसांनी कलम 451, 353, 332, 506 शस्त्र अधिनियम 30 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ते पिस्तुल पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here