लांजा तालुक्यातील बौद्ध समाजाची "माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था" पहिली सर्वसाधारण सभा संपन्न

लांजा तालुक्यातील बौद्ध समाजाची “माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था” पहिली सर्वसाधारण सभा संपन्न

लांजा तालुक्यातील बौद्ध समाजाची "माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था" पहिली सर्वसाधारण सभा संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

लांजा- माता रमाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या तालुकास्तरीय बौद्ध समाजाच्या पतसंस्थेला सहकार निबंधक कार्यालयाकडून नोंदणी सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर दिनांक ३१.०८.२०२२ रोजी पहिली सर्व सभासदाची पहिली सर्व साधारण सभा संस्थेचे मुख्य प्रवर्तक आयु.बी आर.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेला संस्थेचे प्रवर्तक आयु.शिवाजी कांबळे,आयु.अशोक कांबळे,आयु.प्रदीप पवार, आयु.सी.बी.सकपाळ,आयु.आर.बी.कांबळे,आयु.एम.आर.कदम,आयु.सिध्दार्थ जाधव,आयु.विश्वजित कांबळे,आयु.रमेश जाधव,आयु.अशोक कदम,सौ.अचला कांबळे,सौ.चंदना कांबळे इ. संचालक तसेच सहकार अधिकारी श्रेणी १ तालुका निबंधक कार्यालय रत्नागिरी व संस्थेचे मार्गदर्शक आयु.गौतम कांबळेसाहेब,संस्थेचे कायदेशीर सल्लागार व लेखापरीक्षक श्री.हरिश्चंद्र मांडवकर व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेची सुरूवात भगवान गौतम बुद्ध ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील पठण करून करण्यात आली.

सभाध्यक्ष निवड झालेनंतर संस्थेच्या सभासद नोंदणीसाठी मेहनत घेतलेले कालकथित दिनेश कांबळे बापेरे व कालकथित शशांक जाधव कोंडगे या प्रवर्तक सदस्याना व अन्य मृत सभासदांना श्रद्धांजली वाहील्यानंतर सभेला रीतसर सुरूवात करण्यात आली.

लांजा नगरी पतसंस्थेच्या सभासदानी भरगच्च भरलेल्या सभागृहात आयु.आर.बी.कांबळे यांच्या प्रस्तावनेने सुरूवात झाली.त्यानी प्रथमतः लांजा तालुक्यातील जनतेने सभासद नोंदणीसाठी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्था स्थापनेसाठी आवश्यक १५०० सभासदांचे लक्ष पूर्ण करण्यात आले व अजून ही सुमारे १५० सभासदांचे फाॅर्म संस्थेकडे आले आहेत याचीही माहीती देऊन संस्था नोंदणीसाठी सभासदांचे,प्रवर्तक सदस्य आणि सर्व प्रवर्तक संचालक यांचे तसेच सहकार्य लाभलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे संस्थेचे वतीने आभार मानले.संस्था नोंदणीसाठी सहायक निबंधक राजापूर मा.इंगळे साहेब,लांजा तालुका निबंधक कार्यालय सहकार अधिकारी श्रेणी१ मा.सुधीर कांबळे साहेब तसेच रत्नागिरी तालुका निबंधक कार्यालय सह. अधिकार श्रेणी १ व संस्थेचे मार्गदर्शक आयु.गौतम कांबळेसाहेब यांचेही यावेळी संस्थेचे वतीने आभार मानले.

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पहिल्या सर्व साधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आलेले सर्व ठराव उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने शिस्तबद्ध पध्दतीने मंजूर करण्यात आले.

पुढील एक वर्षाचे कालावधीसाठी सर्वानुमते विद्यमान प्रवर्तक मंडळाने संचालक म्हणून कामकाज करावे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
माता रमाई नागरी सह पत संस्थेचे मुख्य प्रवर्तक म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळणारे आयु.बी.आर.कांबळे यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कार्यशील संचालक आयु.अशोक कांबळे यां दोघांचीही निवड बहुमताने करण्यात आली.संस्थेचे सचिव नेमणूकीची प्रक्रियापूर्ण होई पर्यंत मानद सचिव म्हणून आयु.सी.बी.सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली.

सभेत आयु.गौतम कांबळे व आयु अशोक कांबळे यानी ठेव वाढ आणि संस्थेचे पुढील वाटचालीबाबत सभागृहात मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष आयु.बी.आर.कांबळे यानी संस्थेचे कार्यालय साई प्लाझा गाळा क्र.१८ पहिल्या मजल्यावर भाडे कराराने घेतल्याची माहीती दिली.आपली संस्था संगणक प्रणालीच्या सुरू करण्याचे जाहीर करून सभासदांचे मागणीनुसार संस्थेचे उद्घाटन आॅक्टोबर महात धम्म चक्रप्रर्वतन दिनाचे दिवशी करण्याचे जाहीर केले.त्याच दिवशी ५०० सभासदांकडून सेव्हिंग खाती व किमान रू.१० लाख ठेवी पहिल्याच दिवशी गोळा करण्याचा संकल्प सभासदांसमोर जाहीर केला. आणि त्यासाठी सर्व सभासद आणि संचालक यानी एकत्रीत येऊन संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी कामकाज करावे असे आवाहन केले.

सभेला आयु.सचिन जाधव,राकेश कांबळे,दिलीप जाधव,अनिल कांबळे,नथुराम पडवणकर,शशिकांत कदम,वि.धा.जाधव,हनुमंत कदम, एन.बी.कदम,संजय कांबळे,बबन कांबळे मठ,संदेश कांबळे प्रभाकर कांबळे,भिकाजी कांबळे व अन्य विविध क्षेत्रात कामकाज करणारी मंडळी अगत्याने उपस्थित होती.
अध्यक्षीय भाषण झाले नंतर संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे संचालक आयु.शिवाजी कांबळे यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व वयोगटातील सभासदांचे शब्द सुमनांनी आभार मानले.

संस्थेच्या इतिहासातील पहिली जनरल सभा, सभागृह तुडुंब भरलेले असूनही संस्थेचे संचालक आयु.प्रदीप पवार,सिद्धार्थ जाधव रमेश जाधव यानी सभेचे उत्कृष्ट नियोजन केले.त्याना उत्तमरीत्या सहाय्य नितीन कांबळे यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here