शेकापक्षा चे माजी आमदार श्री पंडित शेठ(सुभाष) पाटील यांच्या राहत्या घरी निष्ठावान कार्यकर्त्या नी बाप्पा चे घेतले दर्शन

54

शेकापक्षा चे माजी आमदार श्री पंडित शेठ(सुभाष) पाटील यांच्या राहत्या घरी निष्ठावान कार्यकर्त्या नी बाप्पा चे घेतले दर्शन

शेकापक्षा चे माजी आमदार श्री पंडित शेठ(सुभाष) पाटील यांच्या राहत्या घरी निष्ठावान कार्यकर्त्या नी बाप्पा चे घेतले दर्शन

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:03/09/2022

रोहा:अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.पंडित शेठ(सुभाष)पाटील यांचे पेझारी अलिबाग येथील राहत्या घरी शेकापक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव उत्साह च्या निमित्ताने सदिच्छा भेट दिली.
खांबेरे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच श्री.आत्माराम कासार,ग्रामपंचायत सदस्य श्री.दिपक श्याम गिजे,श्री हरिचंद्र गोयले,श्री.विकास सारंगे व इतर ग्रामस्थांनी माजी आमदार श्री.पंडित शेठ (सुभाष)पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन श्री पंडित शेठ पाटील यांना आमदार होने बाबत प्रार्थना केली.
माजी आमदार श्री.पंडित शेठ पाटील यांनी माजी सरपंच श्री.आत्माराम कासार व इतर ग्रामस्थ यांचे स्वागत करून आभार मानले.
श्री.आत्माराम कासार यांची प्रतिक्रिया घेतली आसता ते म्हणाले
मतदारसंघातील विकास कामे, बेरोजगारी मुळे चणेरा विभागात फडणवीस सरकारने एक अधिसूचना प्रसिद्ध करुन अलिबाग,रोहा,मुरुड तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील १३४०९ हेक्टर्स जमिनीवर नगरसह ‘एकात्मिक औद्योगिक क्षेत्र उभारण्याचे घोषित केले होते.
त्यासाठी वैधानिक अस्तित्व असणारे न.वि.प्राधिकरणही स्थापन करून सिडको मार्फत जमिनी संपादन करण्याचे संबंधिताना लेखी कळविले होते. या प्रकल्पामुळे मुंबई,नवी मुंबई च्या पायाभूत सुविधांवर पडणारा ताण कमी करणे हा फडणवीस सरकार चा हेतु होता.पण सन:२०१९,नंतर झालेल्या सत्तांतरामुळे नवीन आलेल्या ठाकरे सरकारने दि:०८/१०/२०२०,नवीन अधिसूचना प्रसिद्ध करुन या न.वि.प्राधिकरणासह सारी योजना रद्द केली.तरी सदर विषय आसो आगर म्हसाडी धरण आसो कोनही आमदार खासदार या विषयी बोलण्यास तयार नाही, चणेरा विभागाच्या बेरोजगारी व विकास कामाना शेकापक्षा शिवाय दुसरा पर्याय नाही.