मोलगी काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे – युवासेनेचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

55

मोलगी काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे – युवासेनेचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

प्रकाश नाईक

नंदुरबार ब्युरो चीफ

मो. 📱 9511655877

 नंदुरबार :- दि. 04 सप्टेंबर अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, मोलगी हे गाव बाजर पेठचे गाव असल्याने मोलगी या ठिकाणी अनेक खेड्यातील जोडलेले गाव आहेत, या बाजारपेठेत येण्यासाठी नागरिक वाहन प्रवास करुन बाजारात येत असतात.

अशा परिस्थितीत रस्ते खारब असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अपघात देखील होत असतात, ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासना मार्फत सदर रस्त्यावर अपघात होऊ नयेत म्हणून संरक्षण भिंतीची बांधकाम विभागामार्फत सुरु आहेत, परंतु अतिशय नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याने भविष्यात अपघात रोखण्यासाठी सदर होणारे काम हे दर्जेदार असायला पाहिजे परंतु तसे होतांना दिसत नाहीत, फक्त नावालाच मलमपट्टी लावत आहेत म्हणून संबंधित बांधकाम करणाऱ्या यंत्रणेला आपले मार्फत ताकीद देण्यात यावी व सदर बांधकाम करणाऱ्या ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच कामात सुधारणा केली नाहीत तर संबंधित यंत्रणेच्या विरोधात त्या जागेवरच बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.अश्या अश्यायाचे निवेदन निवासी नंदुरबार उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देतांना युवा सेना अक्कलकुवा तालुका प्रमुख जयवंत पाडवी, रघुविरसिंग पाडवी, रतसिंग पाडवी, खेमा वळवी, रंजित वळवी आधी कार्यकर्ते उपस्थित होते.