रोशन लोणारे यांना आऊटस्टँडींग सोशल अवार्ड प्रदान

51

रोशन लोणारे यांना आऊटस्टँडींग सोशल अवार्ड प्रदान

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351 

चंद्रपूर, 4 सप्टेंबर: गगन मलीक फाउंडेशन द्वारा चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात शनिवार २ सप्टेंबर रोजी गगनधम्म युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी बौद्ध धम्मावर विद्वतापूर्वक व्याख्यान दिले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिल्ड व गौतम बुद्धाची मूर्ती प्रदान करण्यांत आली.

चंद्रपूरचे युवापत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रोशन लोणारे यांना डॉ. गगन गलीक यांच्या हस्ते शिल्ड देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मदूत डॉ. गगन मलीक होते तर उद्घाटक महाउपासक सिद्धार्थ हात्ते अंबीरे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे थायलंडचे मानिन उदोम‌कुनिया, कोमक्रीन जुटकानोर, पवन सादमवार, सुरज सादमवार हे होते. या. या धम्म युवा महोत्सवाचे आयोजन गगन मलीक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व आयोजक विषय बोधी डोंगरे, अमीत वाघमारे, विकास तायडे, बाबु रामटेके, आदित्य कोमुलदार, विशाल बतुलवार, प्रशोत शिदुरकर, मयुर बोफनवार आदींनी हा भव्य दिव्य धम्म युवा महोत्सव घडवून आणण्यासाठी अनमोल प्रयत्न केले, कार्यक्रमाचे संचालन अमित वाघमारे यांनी तर आभार विकास तायडे यांनी मानले.