तेव्हाच प्रत्येकाला शिक्षकदिन साजरा करावासा वाटेल?

गुरु…गुरु चांगला असावा. त्यात गुण असावे नसावे हे काही सांगणे नाही व तसं मी मांडतही नाही. परंतु गुरु चांगला असावा असं मी म्हणेल. गुरु हा चांगल्या व्यक्तींचाही असतो व वाईट व्यक्तींचाही असतो. वाईट गुरुपासून वाईट शिकता येते व चांगल्या गुरुपासून चांगलं शिकता येते. जसा चांगल्या कामासाठी गुरु लागतो. तसा वाईट कामासाठीही गुरु लागतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या खुनाबाबत देता येईल. जसा एखादा खुन करायचा असेल आणि त्याचा अनुभव नसेल वा त्याचा गुरु नसेल तर तो करताच येत नाही. आता यामध्ये खुन करणे हे वाईट काम झालं. परंतु तोही नियोजन बद्धपद्धतीनं करावा लागतो आणि त्यासाठीही गुरु असेल तर तो चांगला करता येईल यात शंका नाही.
जसा खुन करणे ही गोष्ट जरी वाईट असली तरी त्याला गुरु लागतो, तसा गुरु चांगल्या कामालाही लागतो. माणसानं गुरु चांगल्या गोष्टीसाठी व चांगल्या कामासाठीच करावा.

चांगल्या कार्यासाठी गुरुही चांगलाच असावा. जर तो चांगला नसेल तर चांगले कार्य घडत नाही. वाईटच कार्य घडते. जसा गुरु, तसे कार्य घडत असते. गुरुबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास द्रोणाचार्यचं देता येईल व परशुरामाचंही देता येईल. कारण परशुराम हे शुरवीर असल्यामुळेच त्यांचे शिष्य असलेले कर्ण वा भीष्म वा द्रोणाचार्य जगात गाजलेले शिष्य ठरले. जे कुणाही मोर शरण गेले नाही व ज्यांनी मोठमोठे पराक्रम गाजवले. तेच घडलं द्रोणाचार्यच्या बाबतीत. द्रोणाचार्यनंही शिकवलेल्या पाच पांडवांनी कधीच कुणासमोर हार मानली नाही. आता कोणी म्हणती की द्रोणाचार्यनं तर पाच पांडवांनाच नाही तर दुर्योधन दुःशासनसह कौरवांनी शिक्षण दिलं. मग ते का बरं बलवान निघाले नाहीत. तर याबद्दलही सांगता येईल की तेही बलवानच होते. परंतु त्यांच्यामध्ये अधर्म होता.

महत्वाचं म्हणजे याबद्दल सांगतांना हे सांगता येईल की गुरु हा फक्त ज्ञान देतो. तो चांगल्या विचारांचा असेल तर तो चांगलं ज्ञान देतो नमस्कार वाईट असेल तर वाईट ज्ञान देतो. परंतु त्या ज्ञानाचा वापर आपण कसा करायचा, हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं. आपण गुरूकडून वाईट ज्ञान जरी घेतलं असेल. परंतु त्याचा सदुपयोग आपण जर चांगल्या कामासाठी केला तर चांगलं कार्य घडेल. जसं भक्त प्रल्हादाला राक्षसकुलातील गुरुंनी वाईट विचारांचे ज्ञान दिले तरीही प्रल्हादानं त्या ज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला. तसंच द्रोणाचार्यनं राज्यातील कौरव व पांडवांना सर्व ज्ञान दिलं. चांगलंच ज्ञान दिलं. तरीही त्याचा वापर कौरवांनी अधर्मासाठी केला व पांडवांनी धर्म राखण्यासाठी.

ज्ञान हे कधीही चांगलं वा वाईट नसतं. त्या ज्ञानाचा वापर आपण कसा करतो. यावर त्या ज्ञानाची उपयोगीता अवलंबून असते. ज्ञानाचा उपयोग हा वाईट पद्धतीनेही करता येते व चांगल्या पद्धतीनेही तेवढाच करता येतो. जर त्याचा वापर धर्मासाठी केला तर ते ज्ञान कधीच हारत नाही आणि अधर्मासाठी केला तर ज्ञान हे विफल होतं.

ज्ञान हे बदनाम नाही. परंतु काही लोकं हे ज्ञानालाही बदनाम करतात त्याचा वापर हा वाईट कामासाठी करुन. त्यातच त्या गुरुंनाही बदनाम करतात, जो ज्ञान देतो. गुरु द्रोणाचार्यनं सर्वांना ज्ञान दिलं. समान ज्ञान दिलं. चांगलं पारंगत केलं. परंतु त्यांच्यापासून घडलेला शिष्यपरीवार हा चांगलाही घडला की ज्यांनी धर्म सोडला नाही आणि वाईटही घडला की ज्यांनी धर्म सोडला व अधर्म मनात बाळगला व जे अधर्मानं वागले.

ज्ञान हे जर धर्माला धरुन असेल तर ते प्रभावी ठरत नाही. याचं उदाहरण म्हणजे ज्या परशुरामानं एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली. त्यांनी भविष्याला व कर्णाला शिकवलं नव्हे तर त्यांचे गुरु बनले. परंतु भिष्म अधर्माला धरुन असल्यानं ते प्रत्येकवेळेस पराभूत झाले. एवढ्या मोठ्या गुरुचे शिष्य असतांना. जे गुरु कधीच पराभूत झाले नव्हते. मात्र भिष्म अधर्माचा धरुन राहिल्यानं त्यांना अर्जुन, प्रफुल्ल व श्रीखंडीनं पराभूत केलं. तेच घडलं कर्णासोबत. कर्णानंही अधर्माला मदत केल्यानं तोही प्रत्येक वेळेस अर्जुनाकडून पराभूत झाला. महाभारताचंच युद्ध नाही तर विराट युद्धाच्या वेळेसही. विराट युद्ध वेळेस कर्णासोबत विशाल सेना होती आणि अर्जुन एकटा होता तरीही.

महत्वपुर्ण गोष्ट आणि वस्तुस्थिती ही की ज्ञान हे ज्ञान असतं. ज्ञानाला दोन बाजू असतात. त्या ज्ञानाचा वापर आपण कसा करतो? यावर भवितव्य अवलंबून असतो. जसं मोबाईलचं उदाहरण घेवू. मोबाईल एक ज्ञानच आहे की एका क्लीकवर सर्व माहिती एका सेकंदात मिळते. मोबाईलचा वापर आपण चांगल्या कामासाठीही करु शकतो आणि वाईट कामासाठीही करु शकतो. परंतु यात आपण जर वाईट कामासाठी त्याचा वापर केला तर आपले वाईटच होईल व चांगल्या कामासाठी केला तर आपले चांगलेच होईल. तेच गुरुचंही आहे. चांगला गुरु हा कधीच वाईट शिकवीत नाही. तो चांगलेच ज्ञान देतो. परंतु आपण त्यानं दिलेल्या ज्ञानावर विचार न करता त्यानं दिलेल्या ज्ञानाचा वापर वाईट कामासाठी करतो, त्यात अधर्म आणतो. मग त्यात आपलं वाईट होतं. मग त्याचा दोष आपण गुरुंना देतो की माझ्या गुरुनं मला वाईट ज्ञान दिलं. तसंच असं म्हणत आपण आपल्या गुरुंना बदनाम करतो. परंतु तसं म्हणतांना आपण त्या गुरुंचे परीश्रम लक्षात घेत नाही. त्यांची आपल्याप्रती असलेली निष्ठा वा भावना लक्षात घेत नाही.

यासाठीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती बनताच शिक्षकांना सन्मान मिळावा म्हणून आपला जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून संपुर्ण भारतात साजरा केला जातो. विशेष सांगायचं झाल्यास कोणताही गुरु हा वाईट ज्ञान प्रसवत नाही. शिकवीतही नाही. खुन कसा करावा हे सांगत नाही वा चोरी कर म्हणत नाही. तो आपले अनुभव सांगतो, जे त्यानं भोगलेले असते. तुम्ही तसं करु नका. कारण त्याचे भगवान वाईट असतात यासाठीच तो आपले अनुभव सांगत असेलही कदाचीत. परंतु आपण त्या गोष्टीतील बरेवाईटपणा न शोधून त्यानं तसं केलं ना , मग मलाही तसं करु दे असं म्हणत असतो व अधर्म पकडतो. अधर्मानं वागण्याचा विचार करतो व वागतोही. त्यानंतर आपलं वाईट होतं आणि ते वाईट झाल्यास त्याचा दोष गुरुंना देतो. तसा दोष आजपासून तरी कोणीही देवू नये म्हणजे झालं.

आज शिक्षकदिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन. हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. तेव्हा सर्वांना एकच सांगणं असेल की त्यांनी या दिवसाची आठवण म्हणून या दिवशीपासून अशी प्रतिज्ञा घ्यावी की आजपासून मी मला मिळालेल्या ज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठीच करीन. तसंच गुरुंनाही सांगणं आहे की त्यांनी विद्या शिकवितांना त्या चांगल्या कामासाठी अन् चांगल्या विद्या शिकवावं. वाईट ज्ञान वा विद्या शिकवू नये. जेणेकरुन या शिक्षकदिनाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल व प्रत्येकाला शिक्षकदिन मनापासून वाटेल हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे, नागपूर

मो: ९३७३४५९४५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here