चिचाळा येथे ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
उमरेड :- चिचाळा येथे ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन दीं 2 सप्टेंबर सोमवारला सायंकाळी साडेचार वाजता केले होते. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये नागरिकांनी मोठ्या आनंदाने सहभागी होत 40 ट्रॅक्टर सजावून मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली . त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर मालक आणि चालक यांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले. आणि शेतकरी बांधवांना बैलपोळा, तांन्हा पोळा , निमित्त शुभेच्छा दिल्या त्यावेळी माझी आमदार सुधीर पारवे , माजी आमदार प्रकाश गजभिये डॉ. शिरीष मेश्राम. मा पंजाबराव अंभोरे सरपंच प्रणिता पडोळे सुधाकर भाऊ पडोळे. सामाजिक कार्यकर्ता चेतन पडले सामाजिक कार्यकर्ता.उपसरपंच सदस्य मुकेश गायगवली. सुधीर जी मोहोड. मनोहर भाऊ वानखेडे पत्रकार महोदय शेखर भाऊ राऊत सामाजिक कार्यकर्ता आणि गावातील सन्माननीय नागरिक मित्रपरिवार माय माऊली मोठ्या संकेत उपस्थित होते.