जिल्ह्यात शुभेच्छांचे बॅनर लावण्यावर बंदी ! पोस्टर बॉईजवर होणार कारवाई

जिल्ह्यात शुभेच्छांचे बॅनर लावण्यावर बंदी !

पोस्टर बॉईजवर होणार कारवाई

जिल्ह्यात शुभेच्छांचे बॅनर लावण्यावर बंदी ! पोस्टर बॉईजवर होणार कारवाई

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: गणेशोत्सवात जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येते. गल्लीबोळातील अनेक पोस्टर बॉईज यानिमित्ताने चमकून घेण्याची हौस पूर्ण करुन घेतात. मात्र अशा चमको लोकांचे बॅनर अपघाताला कारण ठरतात. राजकीय वादालाही निमंत्रण मिळते. याकारणाने जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये, यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अशा बॅनरबाजीवरच बंदी आणली आहे.

राज्यामध्ये ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (३ सप्टेंबर) जिल्ह्यातील शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सव काळात होणार बेसुमार बॅनरबाजी आणि त्यामुळे होणारे अपघात हा विषय चर्चेला आला होता.

या गणेशोत्वावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे मोठमो ठे बॅनर लावेल जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा शुभेच्छांच्या बॅनरवर वादग्रस्त राजकीय टिका टिप्पणी करणारा, चारित्र्य हनन करणारा मजकूर लिहिलेला असतो, त्यामुळे राजकीय मतभेद होऊन शांतता भंग होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर रस्त्यावर लावण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा शांतता समिती सदस्यांनी विनंती केली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश लागू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here