लाडकी बहीण योजनेंतर्गत सुरु असलेल्या पडताळणीला लाभार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा पैकी राज्य स्तरावर करण्यात आलेल्या छाननी मध्ये अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांचे पडताळणी करण्यासाठी संबधित लाभार्थ्यांचे लाभ देणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. लाभ थांबविण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये आधारकार्डप्रमाणे 21 वर्षे वयापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर रेशनकार्डनुसार ज्या कुटूंबात दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे अशा कुटूंबात महिलांचा समावेश आहे.
सबंधित लाभार्थ्यांचे या संदर्भात तसेच कुटूंबात 2 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची महिला व बालविकास विभागाकडून पडताळणी सुरु आहे. सदर पडताळणीनंतर जे लाभार्थी पात्र असतील त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. करिता ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत मिळणारा लाभतात्पुरता बंद झाला आहे, अशा महिला लाभार्थी यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी सपंर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड श्रीकांत रुक्मिणी ज्ञानोबा हावळे यांनी केले आहे.