गया येथे अल्ववयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीने केली आत्महत्या

55

गया येथे अल्ववयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीने केली आत्महत्या


गया: देशभरातील विविध राज्यांमध्ये दलित मुलींवर सामूहिक बलात्कार थांबताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरण देशभर पेटलेले असतानाच बिहारमधील गया येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे.
गयामधील कोच भागात एका अल्पवयीन
दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. दलित मुलीने सामूहिक अत्याचारानंतर फाशी घेत आत्महत्या केली. ही घटना २९ सप्टेंबरला घडली. या बाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, ३० सप्टेंबरला पीडित मुलगी शेजारच्या घरात वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. तेथून ती घरी परतत होती. त्याच वेळी गावातील काही मुलांनी या मुलीला एका मोकळ्या घरात नेलेआणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

या अत्याचारानंतर पीडित मुलगी घरी आली आणि तिने घरातील खोली बंद करून फाशी घेत आत्महत्या केली. घरातील लोकांनी दरवाजा तोडल्यानंतर मुलीने फाशी घेतल्याचे स्पष्ट झाले. मुलगी फाशी घेत लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अधिक चांगल्या उपचारासाठी मुलीला पाटण्याला नेण्याचा सल्ला दिला. उपचाराच्या दुसऱ्या दिवशी या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.

हाथरसच्या घटनेप्रमाणे गयामध्ये देखील पोलिसांचा अमानुष व्यवहार उघड झाला आहे. पोलिसांनी पीडित दलित मुलीचे शवविच्छेदन केले आणि त्यानंतर घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणूक पाहता या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मुद्दा पेटण्याची दाट शक्यता आहे. बिहारमधील विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून बिहार सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. बिहार सरकारदेखील हाथरस सारख्या घटनांपासून दूर राहू शकलेले नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे.