गोवा महामार्गावर विचित्र अपघात
( हिरामण गोरेगांवकर )
कणकवली 3/10/20 :- मुंबई गोवा महामार्गावर वागदे डांगळवाडी येथे विचित्र अपघात.
मुंबई गोवा महामार्गावर वागदे डांगळवाडी येथे एक विचित्र असा अपघात झाला यात एक क्रेटा कार., ऍम्ब्युलन्स , मालवाहुटेम्पो तसेच मोटारसायकलचे नुकसान झाले याबाबत सविस्तर वृत्त असे कि कसाळहुन कणकवलीच्या दिशेने येणारी क्रेटा कार वागदे डांगळवाडी येथे पुलावर पलटी झाली. त्यावेळी कारमधील जखमींना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलावण्यात आली. अपघातग्रस्त कार जवळ उभ्या असलेल्या ऍम्बुलन्सला रस्त्याचे काम चालू असलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या मालवाहू काँक्रीट डंपरने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि अपघात ठिकाणी लगतच असलेल्या छोटा हत्ती टेम्पो तसेच मोटारसायकल चेही खूप मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दिलीप बिल्डकॉन च्या डंपर ड्रॉयव्हर ने केला पोबारा अपघाता आधीच ऍम्ब्युलन्स ड्रॉयव्हर पिंट्या जाधव ऍम्ब्युलन्स मधून अगोदरच उतरल्याणे सुदैवाने बचावला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत पुढील तपास चालू आहे.