पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे

59

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे – महेश म्हात्रे (वरिष्ठ संपादक)

प्रतिनिधी – धगधगती मुंबईच्या प्रतिनिधी कोमल गायकवाड यांच्या संकल्पनेतून सायन किल्ला येथे वृक्षारोपण कार्यक्रम संगम प्रतिष्ठानच्या कोमल घाग यांच्या नियोजनात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज 18 लोकमत चे वरिष्ठ संपादक महेश म्हात्रे यांनी दोन्ही कोमल बद्दल चांगली संकल्पना राबवून आपण पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इतर तरुणांना एकत्र करून वृक्षारोपण करत असल्याबद्दल कौतुक केले.त्याचबरोबर मला काय करायचं असे म्हणण्यापेक्षा मी काहीतरी करणारच असे ध्येय समोर ठेवले पाहिजे. जे झाड आपण लावतोय ते जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपली आपण काळजी घेतो अशीच काळजी झाडाची घेतली गेली पाहिजे.मुंबईबाहेर अनेकजण असे कार्यक्रम करतात पण मुंबईतही झाडे लावण्याची जास्त गरज आहे.जेवढा तुम्हाला ऑक्सिजन मिळेल तेवढा घेता आला पाहिजे.यासाठी तुमच्यासारखे इतर तरुणांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे.समाज काय करतोय किंवा काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा मी स्वतः काहीतरी करतोय जे मला आवडते याला जास्त महत्व द्या तरच तुमच्यातील निसर्ग,पर्यावर्णबद्दल प्रेम निर्माण होईल मग नक्कीच बदल घडेल आणि संगम प्रतिष्ठान राबवत असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन व स्वच्छतेबाबत कौतुक केले.कोमल गायकवाड सारख्या मुलीसारखे इतरांना ही अशा संकल्पना सुचल्या पाहिजेत.आजच्या घडीला याची जास्त गरज असल्याचेही शेवटी म्हणाले.
यावेळी कॉग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, दै.सागरचे जयराम सावंत,घन-कचरा व्यवस्थापनेचे पर्यवेक्षक तानाजी घाग,धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,संतोष लिंबोरे,संगम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कोमल घाग डी डी एम च्या प्रतिनिधी कोमल गायकवाड उपस्थित होत्या.