भाजपचा हुकूमशाही चेहरा उघडा पडला; लखीमपूर हिंसेवरून मायावतींची टीका.

भाजपचा हुकूमशाही चेहरा उघडा पडला; लखीमपूर हिंसेवरून मायावतींची टीका.

भाजपचा हुकूमशाही चेहरा उघडा पडला; लखीमपूर हिंसेवरून मायावतींची टीका.

विशाल गांगुर्डे प्रतिनिधी 

लखमीपूर : – जिल्ह्यातील मुख्यालयाजवळ जवळ झालेल्या हिंसेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मृत पावलेल्या लोकांमध्ये चार शेतकऱ्यांचा आणि इतर चौघांचा सामावेश आहे. त्यापैकी दोन भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर दोन चालकांचा सामावेश आहे. या हिंसेत १२ ते १५ जण जखमी आहे. या हिंसेमागे केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा सामील असल्याचा शेतकरी आंदोलनातून आरोप करण्यात येत आहे. या घडलेल्या हिंसक घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी बसपा अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.

बसपा अध्यक्षा मायावती यांनी ट्विट करत लखीमपूर हिंसेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मायावती म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यातील खीरी येथे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी चालवून हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. या घटनेतून भाजपचा हुकूमशाही चेहरा उघडा पडला आहे, हाच त्यांचा खरा चेहरा आहे.

उत्तरप्रदेशच्या या लखीमपूर खीरी प्रकरणात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी बसपा अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. ‘बसापाचे राष्ट्रीय महासचिव राज्यसभा खासदार एससी मिश्र यांना मध्य रात्री लखनऊ येथील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले, यामुळे मिश्र हे लखीमपूर खीरी प्रकरणाचा रिपोर्ट प्राप्त करू शकले नाही. ही घटना अतिशय दु:खद आणि निंदणीय आहे.’ मायावती पुढे म्हणाल्या.