अज्ञात युवकांनी पेट्रोल टाकून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक जाळला..!

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी मो.८४८४९८८३५५
घुग्घुस:- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे अज्ञात युवकांनी पेट्रोल टाकून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक पेटविलाची घटना काल रात्रीच्या सुमारास मुंगोली चेक पोस्ट वर घडली आहे. यात ट्रक पुर्ण जळून खाक झाले. या घटनेमुळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाहन चालक चरणदास चेन्नूरवार घुग्घुस वोल्ड रेल्वे सायडिंग वरुन कोळसा खाली करुन जात अस्ताना मुंगोली चेक पोस्टच्या जवळपास ६ ते ७ अज्ञात इसम तोंडावर दुपट्या बाधून आले. व वाहन चालकास ट्रकच्या खाली उतरविले.त्यानंतर तिन अज्ञात इसमानी ट्रक चालकास पकडून ठेवले व वाहनाला पेट्रोल टाकून पेटविले,याची माहिती शिरपुर पोलीसाना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा बयान घेऊन अज्ञात इसमा विरुद्ध गुंन्हा नोंद केला,पुढील तपास शिरपुर पोलीस एपीआई गजानन करेडवार यांचा मार्गदर्शनात शिरपुर पोलीस करीत आहे.