लवकरच सामान्य प्रवाशांसाठी रेल्वेची पॅसेंजर सेवा सुरु होणार.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा :- संपूर्ण राज्यामध्ये कोरोना वायरसच्या माहामारीचे प्रादुर्भाव असतांना, रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना फक्त ऑनलाईन तिकिटांद्वारे प्रवास करण्याची परवानगी दिली होती. अशामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे नियोजन न केलेल्या ऐनवेळी प्रवासाची खूप गैरसोय होत होती. आता राज्यात कोरोना वायरसचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होत असल्याने, लवकर सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर सेवा सुरु करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये रेल्वे मार्गावर चालणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तसेच गाड्या टप्प्या-टप्प्याने सुरु होणार आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. रेल्वे विभागाने अन्य भागात पॅसेंजर ट्रेन सुरु केल्या आहेत. राज्यातील अनेक विभागात पॅसेंजर रेल्वे मात्र ऑक्टोबरमध्ये सर्व पॅसेंजर टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, महाव्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आली आहे.
कोरोनातील निर्बंधाची अंमलबजावणी करत, केवळ फक्त एक्सप्रेस गाड्यांचीच सुविधा रेल्वे प्रशासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. पॅसेंजर सेवा बंद आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. एक्सप्रेस रेल्वेत सामान्यांसाठी काही राखीव रेल्वे कोच देण्यात येत होते. पण एक किंवा दोन एक्सप्रेस रेल्वे वगळता इतर कोणत्याही रेल्वेत सामान्यांसाठी जनरल डबे ठेवण्यात आलेले नाही.