नागपुर जिल्हातिल उमरी वाघ गाव घाणीच्या विळख्यात!

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
नागपुर:- तालुक्यातील उमरी वाघ हे गाव घाणीच्या विळख्याने व्यापले असुन सरपंच व पदाधिकाऱ्यांचे लक्षच नाही कारण सरपंच हे शहरात राहत असल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे अजिबात देणे घेणेच नसल्याचे गावात फेरफटका मारला असता निदर्शनास येते. गावात येणारे जाणारे मार्ग घाणीने व्यापलेले आहेत, गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर हे उतार भागात असल्याने पाऊस पडला घाणीचे पाणी सदर विहीरीत साचते आणि त्याच पाण्यायाचा नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या नागपुर जिल्हात सर्वत्र डेंग्यूची साथ असल्याने स्वच्छता राखणे गरजेचे असुन सुद्धा स्थानिक प्रशासन या गंभीर बाबी कडे अजिबात लक्ष द्यायला तयार सल्याचे प्रकर्षाने जाणवते सांडपाणी सुध्दा नाल्या नसल्याने गावातच डबक्यांमध्ये साचते त्यामुळे डेंग्यू सारख्या मछरांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. सबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले होते.