वेकोली विरोधात गावकऱ्यांनी सहा तास रोखली वाहतूक, गांधीगिरी आंदोलनात भजन दिंडीने वेधले लक्ष.

वेकोली विरोधात गावकऱ्यांनी सहा तास रोखली वाहतूक, गांधीगिरी आंदोलनात भजन दिंडीने वेधले लक्ष.

वेकोली विरोधात गावकऱ्यांनी सहा तास रोखली वाहतूक, गांधीगिरी आंदोलनात भजन दिंडीने वेधले लक्ष.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

बल्लारपुर:- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत गोवरी, पोवनी-साखरी कोळसा खदानतून होणारी अवजड कोळसा वाहतूक थांबवण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खराब रस्त्याविरोधात गावकऱ्यांनी पोवनी फाट्यावर शनिवारी २ ऑक्टोबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधीगिरी आंदोलन केले.

मागील महिन्याभरापूर्वी या मार्गावर गावकऱ्यांनी वेकोलीची कोळसा वाहतूक रोखली होती. त्यावेळी वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र तब्बल महिना लोटूनही गावकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळलेले नाही, त्यामुळे गोवरी येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर जुनघरी व पोवनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कावळे यांचे नेतृत्वात ज्येष्ठ नागरिक मारोती लोहे, रामकिसन लांडे, प्रभाकर लोहे, गोसाई उताणे, ग्राम पंचायत सदस्य चेतन बोभाटे, अनिल बोबडे, धनंजय लोहे, अमोल लांडे, विनोद शिडाम, तेजस पाचभाई, अनिल मादनेलवार, सतीश वडस्कर, भूषण कावळे, सूरज वासलेकर, प्रणय नागपुरे, हंसराज बोढे, विशाल गाथाडे, प्रदीप कावळे, अंकुश पोटे, अमोल लोहे यांचेसह गावकऱ्यांनी गांधी जयंतीदिनी गांधीगिरी आंदोलन करीत वेकोलिची वाहतूक तब्बल सहा तास रोखून धरली.

गोवरी पोवनी साखरी मुख्य मार्गावर २० टन क्षमता असलेल्या मार्गावरून ६० टन क्षमतेची कोळसा वाहतूक सुरू आहे, त्यामुळे या मार्गावर महाकाय खड्डे पडलेले आहेत, धुळीचा प्रचंड त्रास होत आहे, अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे याकडे आरटीओ आणि पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. आंदोलन दरम्यान वेकोलीचे वाहतूक तब्बल सहा तास रास्ता रोखून धरला होता.