हेल्मेट सक्तीसाठी विरूर पोलिसांचा नवा उपक्रम, विरुरकरानो हेल्मेट घाला नाहीतर..

✒️खुशाल सूर्यवंशी✒️
राजुरा शहर ग्रामीण प्रतिनीधी
8378848427
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुरकरांनो दुचाकीवर बसताना तुम्ही जर हेल्मेट घातले नाही तर तुम्हाला आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण हेल्मेट नसेल तर पोलिसांकडून एक अनोखी शिक्षा दिली जात असून पोलिसांची ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. त्यामुळे हेल्मेटच्या कंटाळा करत असाल तर तुम्हाला महागात पडणार आहे.
हेल्मेटसक्तीसाठी चंद्रपुर पोलिसांनी अनेक वेळा आव्हान केले. मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसला नाही. जिल्हात आणि तालुक्यात दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. त्यात अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते आणि हिच परिस्थिती बघता वारंवार आवाहन करून देखील नागरिक हेल्मेटचा वापर करत नसल्याने दिसून येत होते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार ठाणेदार राहुल चव्हाण यांचा मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशन समोर दुचाकी चारचाकी वाहनांची चेकिंग करण्यात आली. यावेळी ठाणेदार राहुल चव्हाण यांनी दुचाकी चालवतांना हेल्मेटचा वापर करावा. अशी सुचना दुचाकीस्वारांना दिली.
विरुर पोलिसानी नागरिकांना मार्गदर्शन करत हेल्मेटचे महत्व पटवून दिले जाते. तसेच वाहतुकीचे नियमही समजावून सांगितले जातात. पोलिसांनी आता ही मोहीम हाती तर घेतली आहे मात्र ती कितपत यशस्वी होते, हे आगामी काळात बघणं महत्वच ठरणार आहे.