शांतिदुत बुध्द विहार सायन कोळीवाडा येथे “चौदावे धम्मपुष्प संपन्न”
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई – सायन कोळीवाडा मध्ये शांतीदुत बुध्द विहार सेवा संघ, नवरत्न महिला मंडळ आणि ई – ९ चाळ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बिएमसी बिल्डिंग ई – ९ संचालित “शांतीदुत बुध्द विहार” येथे बौध्दाचार्य जितेंद्र स. कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले “२०२२ वर्षावास प्रवचन मालिका” मधील तिसरे सत्रातील शेवटचे चौदावे धम्मपुष्प सोमवारी दि. ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी मुंबई मधील रात्रशाळेतील शिक्षण घेणा-या तळागाळातील श्रमिक रत्नांना चमक देणा-या “मासूम संस्था” चे करिअर सेल विभागाचे व्यवस्थापक आयु. युवराज बो-हाडे सर यांनी “ध्येय, दिशा आणि वाटचाल” ह्या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रमुख प्रवक्ते म्हणून आयु. युवराज बो-हाडे सर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,आधुनिक काळातील स्पर्धात्मक युगात शालेय जीवनात योग्य ध्येय निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याने दहावी आणि बारावी नंतर नेमकी दिशा का आणि कशासाठी निवडावी? निव्वळ शिक्षण न घेता कमी वेळेत वेळ आणि पैसा वाचवून यशस्वी झेप कशी घ्यावी? शैक्षणिक बरोबर अंतर्भूत गुणांसह कौशल्य विकास तसेच आपल्या कल्पकतेच्या नवनिर्मीतीसह कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रातून कधीही न ऐकलेल्या करियर घडविणा-या आठ विविध विभागातून किमान दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही योग्य दिशेने वाटचाल करून इच्छित करिअर करता येते, असे आपल्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
मासूम संस्थेच्या सेल विभागाचे सह प्रतिनिधी संदिप शेलार यांनी तांत्रिक आर्थिक परिस्थितीतून अर्धवट शिक्षण सोडून शिक्षणापासून दुरावलेले परंतु काहितरी नव्या उमेदीने जगणा-याला वयोमर्यादा किंवा परिस्थितीची कारण न देणा-यांसाठी रात्रशाळा आणि त्यातून मासूम संस्थेतर्फे मिळणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक पाठबळ देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी शिक्षणासाठी वाटचाल करावी, असे मौल्यवान मार्गदर्शन करताना जगाचे ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ ठरलेले “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांचे उदाहरण पटवून दिले.
तसेच, बौध्दाचार्य जितेंद्र सखाराम कांबळे गुरुजी यांनी वर्ष २०२१ – २०२२ मध्ये सायन च्या काळा किल्ल्याजवळील ज्ञानविकास नाईट हायस्कुल मधून इयत्ता दहावी ७८% उत्तीर्ण होऊन आता मासूम संस्थेतर्फे मिळालेल्या स्कॉलरशिपच्या आधारे वयाच्या ४२ व्या वर्षी हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स करत असल्याची माहिती देत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होता येते. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शक आवश्यक असते, असा संदेश दिला.
शेवटी प्रमुख प्रवक्त्यांचे पुष्पगुच्छ आणि सुधारित भारतीय संविधान देत उपस्थित उपासक उपासिकांनी सामुदायिक सरणंत्तय् गाथा व्दारे “२०२२ वर्षावास प्रवचन मालिका” मधील शेवटचे चौदावे धम्मपुष्प संपन्न केले.