नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं
मो 9096817953
नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त (66th होणाऱ्या सोहळ्याला पंचशील ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे.दीक्षाभूमीवरील बौद्ध स्तूपाच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यानंतर बुद्ध वंदना देखील करण्यात आली. त्यानंतर आता उद्या अर्थात 5 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. तिथीनुसार उद्या हा दिवस साजरा होणार आहे.दीक्षाभूमी येथे 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंचशील ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर या सोहळ्याचा अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. दीक्षाभूमीवरील बौद्ध स्तूपाच्या मागच्या बाजूच्या मैदानात पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांनी हे ध्वजारोहण केलं असून त्यानंतर बुद्ध वंदना ही करण्यात आली. पंचशील ध्वजाच्या पाच रंगांमध्ये तथागत गौतम बुद्धांचे विचार व्यक्त होतात. त्यामुळेच या ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली.
नागपूरची अवघी दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी नाहून निघाल्याचं आता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे सर्व जग हैराण होतं. भारतातही सण साजरे करण्यावर अनेक निर्बंध होते. त्यामुळेच धम्मचक्र प्रवर्तन दिनही हवा तसा साजरा करता येत नव्हता. पण आता कोरोनानंतर होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील सर्वच राज्यातून बौद्ध अनुयायीयेणार आहेत. त्यामुळे लाखो अनुयायी यंदा येतील असा असा दावाही समितीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या नागपूरच्या दिक्षाभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळण्याची शक्यता आहे.