मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालयाद्वारे गांधी जयंतीनिमित्त पथनाट्यद्वारे जाणीवजागृती
जितेंद्र तडस
हिवरखेड शहर प्रतिनिधी
मो: 9730278114
नरखेड : मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नगर परिषद नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव चोक नरखेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छ गाव , समृद्ध गाव ” या विषयावर पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री गवई साहेब मुख्यधिकारी नगर परिषद नरखेड, मा.प्राचार्य श्री. कोहळे सर मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड,मा.प्रा.बालाजी आडे सर, मा. प्रा. श्री. देशमुख सर,रासेयो कार्यक्रम अधिकारी मा. प्रा. राधेश्याम ठाकरे सर, प्रा.डॉ. मनोज पवार सर मा.श्री मधुकर श्रीराम इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा.बालाजी आडे सर यांनी केले असून आभार प्रदर्शन श्री प्रा.राधेश्याम ठाकरे रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले.या कार्यक्रमातून गावात स्वच्छता ठेवणे, कचरा व्यवस्थापन करणे, सामुदायिक शोषखड्डे निर्माण करणे, प्लास्टिक बंदी करणे तसेच गाव स्वच्छ व सुन्दर निर्माण करणे इत्यादी विषयावर जनजागृती करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.बालाजी आडे सर यांनी यथक परिश्रम आणि मोलाचे सहकार्य केले. त्यावेळी नरखेड येथील नगरपालिका शाळेतील शिक्षक व विद्यार्थी गावातील नागरिक तसेच महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.