घोणस अळीच्या चाव्याने महिला गंभीर शेतकऱ्यांमध्ये घोणस अळीची दहशत 

58

घोणस अळीच्या चाव्याने महिला गंभीर शेतकऱ्यांमध्ये घोणस अळीची दहशत 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

बल्लारपूर : तालुक्यातील कवडजई येथील महिला अर्चना अविनाश सातर (३०) या रविवारी सकाळी गवत कापण्यासाठी गेल्या असता, त्यांना घोणस अळीने चावा घेतला. त्यांना जाणीव होताच, रुग्णालयात भरती केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच, कृषी सहायक घनश्याम टाले, कृषी पर्यवेक्षक नीलेश इंगळे यांनी अर्चना सातर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी गावचे उपसरपंच नितीन येलोरे उपस्थित होते. तालुक्यातील कवडजई येथे घोणस अळी आढळून आली आहे. घोणस अळी विषारी असून, ब्लेडसारखी काटेरी असते. या अळीच्या शरीरावर केस असतात. या केसामधून एक रसायन बाहेर पडते, ते विषारी असते. अळीचा रंग पिवळा हिरवा असतो. घोणस अळीच्या चाव्याने, तसेच स्पर्शाने अंग बधिर होऊन त्रास जाणवतो.