जोगेश्वरीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न

72

जोगेश्वरीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो. नं. – ८१४९७३४३८५

जोगेश्वरी:- जोगेश्वरी पूर्व प्रभाग क्रमांक ७३ चे मा. नगरसेवक श्री. प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी नगर व संत रोहिदास नगर येथील रहिवाशी करिता आज दि.४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई महापालिकेच्यावतीने सौ. सायली मिर्लेकर यांनी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” व “मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान” या अभियानंतर्गत कालिमाता सेवा संघ जवळील शिवशक्ती नवरात्रौस्तव मंडळाने विभागातील माता व भगिनींच्या आरोग्याची मोफत तपासणी करिता आरोग्य शिबिर आयोजित केले होते.

 सदर शिबिराचा लाभ सुमारे ८० रहिवाश्यानी घेतला. हे शिबीर यशस्वी करण्याकरिता स्कवाटर्स कॉलनी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.