PMAY ग्रामीण चा नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संवर्गासाठी किमान सात ते नऊ हजार उद्दिष्ट एवढा द्या.– मा. श्री.विठ्ठल पाटील गवळी. यांची मागणी.
नांदेड प्रतिनिधी
अशोक वाघमारे.
मो 8010874742
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संवर्गासाठी PMAY ग्रामीण अंतर्गत 2021- 22 चा वर्षात किमान 97 हजार उद्दिष्ट एवढा देण्यात यावा नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थीसाठी 23 हजार 625 इतका उद्दिष्ट देण्यात आले होते. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्याक संवर्गासाठी 14338 एवढा उद्दिष्ट देण्यात आला त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्याक संवर्गासाठी केवळ 87 एवढा उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी केवळ तेरा घरकुल मंजूर करण्यात आले इतर संवर्गासाठी शासनाकडून घरकुल योजनेच्या अनेक योजना आहेत जसे की रमाई आवास,सबरी आवास, पारथी आवास, सारख्या योजना आहेत. मात्र अल्पसंख्याक संवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजना हे एकमेव पर्याय असून त्यातही अल्पसंख्याक संवर्ग असा वेगळा कोठा करण्यात आला आहे. आणि घरकुलाची किमान मर्यादा ठेवून देण्यात आला असून हे एका प्रकारचा अल्पसंख्याक समाजावर अन्याय म्हणायचा का अशा प्रकारची चर्चा आता अल्पसंख्यांक बांधवाकडून होताना दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या पाहता 2021 -22 साठी दिलेल्या उद्दिष्ट फारच अल्प प्रमाणात असून अल्पसंख्याक समाजासाठी ते सरकारकडून तुटपुंजित आहे. 2021 22 चा कोटा किमान पाच ते सहा हजार एवढा तरी पाहिजे होता परंतु अल्पसंख्यांक समाजासाठी आणि अपेक्षित उद्दिष्ट देण्यात आला आहे. अल्पसंख्यांक संवर्ग प्रपत्र (ड ) यादीतील पात्र लाभार्थी आहेत तेथील एकूण उद्दिष्टांच्या प्रमाणात प्रतिवर्षी किमान 50 ते 60 अल्पसंख्यांक नागरिक सदर घरकुलांचा लाभ घेत असतात उदा. कुंटूर येथील अल्पसंख्यांक स्वर्गात एकूण 90 पत्र लाभार्थी आहेत मात्र एकही घरकुल सदर लाभार्थ्याला मिळाले नाही हे अल्पसंख्याक समाजाची गळचेपीच आणि अल्पसंख्याक समाजाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून समाजाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बांधवांवर होत असलेला अन्याय दिवसेंदिवस वाढत असून याकडे शासनाने त्वरित लक्ष घालून अल्पसंख्यांक स्वर्गासाठी किमान 7-9 हजार एवढा उद्दिष्ट देण्यात यावा समाजाला अधिकाधिक लाभ देण्यात यावा यासाठी समाजवादी पार्टीचे नांदेड युवक जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल पाटील गवळी यांनी मा प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्राम विकास यंत्रणा नांदेड येथे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.सोबत नायगाव युवक माजी तालुका अध्यक्ष आजम शेख.नायगाव अल्पसंख्याक काँग्रेस सेवा दल माझी तालुका अध्यक्ष फयुम भाई.कुंटुर युवा प्रमुख अफरोज चौधरी.पत्रकार बालासाहेब शेळगावकर साहेब.
अफरोज चौधरी, जहिर शेख, साजिद शेख, युसुफ शेख, गनी शेख, जिलानी शारवाले, जिलानी कल्यापुरे, सादक सय्यद, जिब्रान शेख, इल्लु शेख, रिजवान शेख, अयुम शेख, अजमोद्दीन शेख, घुड़ू कल्यापुरे, पाशा शेख, आलिम शेख, मोहम्मद शेख, सद्दाम शेख, अहमद शेख, सकलेन शेख, सोहेल शेख, खाजा चौधरी, रिहान चौधरी, बबलू शेख, वाजिद शेख, अजहर शेख, मोसीन शेख.व अनेक लाभार्थी उपस्थित होते.zp.नादेड.
