देशासाठी धर्मासाठी सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजेत !

देशासाठी धर्मासाठी सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजेत !

देशासाठी धर्मासाठी सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजेत !

देशासाठी धर्मासाठी सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजेत !
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांनी मा. बापूसाहेब कौडगावकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन….

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
अशोक वाघमारे
मो 8010874742

नांदेड :- हिंदू धर्मात आठरापगड जाती आहेत असूद्या मात्र जेव्हा धर्मावर संकट येत असेल तर सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजे असा मौल्यवान संदेश सुप्रसिद्ध ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांनी मौजे कौडगाव (ता.उमरी ) येथे युवा नेते तथा सरपंच बापूसाहेब पाटील कौडगावकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात उपस्थित भाविकांना केला आहे .
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक कौडगावचे सरपंच बापूसाहेब पाटील कौडगावकर यांचा वाढदिवस काल दिनांक १ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रम जसे की , शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप, उमरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व ब्लॅंकेट वाटप, वृक्षारोपण , हनुमान मंदिरात महाआरती , महाप्रसादाचे वाटप आदी उपकृम राबवून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला असून या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या पुनम पवार , काँग्रेस नेते मनोज पाटील मोरे, गणेश पाटील येताळे कौडगावकर, तिरुपती पाटील येताळे कौडगावकर, गजानन पाटील होटाळकर , गोविंद पाटील नरवाडे , हनुमंतराव तोडे, गंगाधर पा.बेलकर, श्याम पाटील चौंडे, पत्रकार नरेंद्र येरावार, विजय ढगे, दत्ता पाटील ढगे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे उपदेश करीत असताना ह भ प पुरुषोत्तम महाराज म्हणाले की ,
रामगीरी महाराज हे मोहम्मद पैगंबर विषयी काय बोलले माहीत नाही ? पण अनेक आमदार व खासदार हे शासनाला पत्र देतात आणि रामगीरी महाराजाला कठोर शिक्षा झाली पाहीजे ही मागणी करतात ही खेदजनक बाब आहे .
त्यांनी हैदराबादचा असदुद्दीन ओवेसी , सुशमा अंधारे यांसारख्या वाचाळ नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तरी यांच्या वक्तव्या बाबत काहीच बोलत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला .
त्याचबरोबर सर्व हिंदू समाज हा एकजुटीने राहिला पाहिजे वारकरी संप्रदायाशी आपली नाळ जोडली पाहिजे असे सांगून देश हितासाठी हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा मतदान करण्याची वेळ येते त्यावेळेस प्रत्येकाने मतदान करावे असे देखील त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगत मतदान करणे हा आपला धर्म आहे ही बाब लक्षात आणून दिली त्याचबरोबर आपण आपल्या आई-वडिलांची निष्ठेने सेवा करावी असा संदेश देत एकसंघ असणाऱ्या कौडगावकर परिवाराचे कौतुक केले .
याप्रसंगी बापूसाहेब पाटील कौडगावकर यांच्या मित्र मंडळांने बापूसाहेब कौडगावकर यांचा जेसीबी मशीनच्या सहाय्याने भला मोठा हार घालून त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार केला त्याचबरोबर विचार मंचावर केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी बापूसाहेब कौडगावकर यांनी उपस्थित जनसमुदायाशी बोलत असताना भारावून गेले व पुढे बोलताना म्हणाले मी आपल्या सेवेत सदैव आहे आणि राहील याची ग्वाही दिली . याप्रसंगी कौडगाव , येंडाळा , महाटी , बळेगाव , धनंज , राहेर यांसह उमरी पंचक्रोशीतील, महीला ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .