रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

67
रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात उत्साह साजरा.

रयत शिक्षण संस्थेचा 106 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

दैनिक मीडिया वार्ता. अहिल्यानगर: कोपरगाव
सुनील भालेराव.
9370127037.

दि.4.10.25. अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल मध्ये रयत शिक्षण संस्थेचा 106.वा. वर्धापन दिन विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी इयत्ता 10.वी. गुरुकुलच्या वर्गाचे वर्गशिक्षक श्री.सांगळे पी.आर.सर,
विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर.एस.सर व पर्यवेक्षक
श्री.जेजुरकर.व्ही.के.सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली
सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी इ.10.गुरुकुल वर्गातील विद्यार्थिनींनी इंग्रजी भाषेतील परिपाठात संस्थेविषयी माहिती सांगून प्रश्नमंजुषेद्वारे विद्यार्थ्यांच्या संस्थेविषयीच्या ज्ञानास उजाळा दिला.
विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर.एस.सर आणि पर्यवेक्षक श्री. जेजुरकर व्हि.के. सर यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेविषयी माहिती सांगत विद्यार्थ्यांशी हितगुज केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सांगळे पी.आर.सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेची स्थापना,शाखा विस्तार,संस्थेचे विद्यार्थी,सेवक वर्ग,संस्थेचे विविध क्षेत्रातील यश,संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्यासंदर्भातील उचललेले क्रांतिकारी पाऊल याविषयी सखोल माहिती दिली.
कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर सेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन इयत्ता दहावी गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी तर आभार श्री.शिंदे बी.एम.सर यांनी मानले.