ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मागण्यासाठी ओबीसी समाजाच्या विविध संघटना द्वारा एल्गार आंदोलन
ओबीसींची राष्ट्रीय जनगणना तातडीने करा.
ओबीसी समाजाच्या विविध संघटना द्वारा एल्गार आंदोलन.
अर्चना झालटे प्रतिनिधी
समुद्रपुर:- ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मागण्यासाठी ओबीसी समाजाच्या विविध संघटना द्वारा एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यावेळीआदोलनकतर्यानी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनातून ओबीसी समाजाची ओबीसींची राष्ट्रीय जनगणना केंद्र सरकारने तातडीने करावी आणि केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने करावी. तसेच लवकरात लवकर महाज्योती योजनेसाठी 500 कोटी रुपये निधी महा ज्योती च्या खात्यात जमा करावी. ओबीसी शेतकऱ्यांना एससी-एसटी प्रमाणे निधीची टंचाई दूर करावी. महाराष्ट्रातील सर्वसाठी स्पर्धा परीक्षा पोलीस भरती इतर नोकरी भरती कुणाचाही दबावाला बळी न पडता त्वरित सुरू करावी ओबीसी विद्यार्थी साठी 72 वस्तीगृह किरायच्या इमारतीमध्ये सुरू करावी ओबीसी विद्यार्थी थकित स्कॉलरशिप त्वरित देण्यात यावी महा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळ ओबीसी लोक जनसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करावे या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सात डिसेंबरला विधानपरिषदेला घेराव घालणारअसा इशारा निवेदनातून देण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ऋषभ राऊत, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हा, अध्यक्ष रोहित हरणे, शेषराव येलेकर, अशोक पवार, राहुल कोळकर, दिनेश काटकर, प्रकाश राऊत, सुनील डोंगरे, राजू मंगेशकर, सौरभ हिवरे, ऋतिक मोघे, प्रज्वल ठाकरे, गौरव गुडधे, प्रमंशू डाहे, गोपाल व इतर उपस्थित होते