पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले.
नाशिकच्या सोनाराकडून 1 लाखाची लाच घेताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी 32 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
संगमनेर:- मंगळवारी दुपारी २.३० वाजता पोलिस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. मालदाड रोड येथे राहणाऱ्या मंगल संजय डमरे यांच्या घरात त्यांच्याच मुलाने चोरी केली.
वडील आजारी असल्याचे कारण सांगून आतिष डमरे याचा जोडीदार सूरज व त्याची पत्नी निकिता वाघ यांनी नाशिक रोड येथील एका प्रसिद्ध दुकानात सोने विकले. सोनाराकडून पोलिसांनी सोने ताब्यात घेतले.
उपनिरीक्षक परदेशी याने प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाखांची मागणी सराफाकडे केली. रितसर व्यवहार केल्याने पैसे कशासाठी द्यायचे? असा सवाल करत सराफाने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली.
उपनिरीक्षक परदेशी याने प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाखांची मागणी सराफाकडे केली. रितसर व्यवहार केल्याने पैसे कशासाठी द्यायचे? असा सवाल करत सराफाने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली.
परदेशी याच्या सांगण्यावरून विशाल रवींद्र पावशे 31, साईश्रद्धा चौक, संगमनेर) याच्याकडे तक्रारदाराने एक लाख देताच त्यास पथकाने ताब्यात घेतले. चाहूल लागताच परदेशीने पळून जाण्याच्या प्रयत्न केला.
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला पकडले.