वीजबिल माफीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा हिसका, पावर हाउस येथे टाला ठोको आंदोलन.
लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने विदर्भ राज्य आंदोलन महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडून हिसका दाखवला. कर्मचाऱ्यांना आत सोडण्यावरून आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.
पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीने महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन. आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाल्यानंतरही तब्बल चार तास मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.
लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने यांनी मंगळवारी महावितरणच्या जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकणार असल्याचा इशारा आंदोलनावेळी दिला होता; पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संताप अनावर झालेल्या टाळे ठोको आंदोलन करण्यांत आंले.