मुंबईतील कळव्यात दुसरी बरोबर असलेल्या प्रेम संबंधातुन 6 महिन्याचा गर्भवती पत्नीला रॉकेल ओतुन जिवंत जाळले.
=== मुख्य मुद्दे ===
● गर्भवती पत्नीला पतीने जिवंत जाळले
● कळव्यातील मफतलाल कॉलनीतील घटना.
●आरोपीने डोंबिवलीतील येथील निहारिका नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेऊन दुसरा विवाह केला.

✒MVN मुंबई ब्युरो चीफ✒
मुंबई,दि.4 नोव्हे:- मुंबईच्या उपनगर ठाण्यातील कळवा परिसरातुन एक खळबळजनक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. कळवा परिसरातील मफतलाल कॉलनी येथे कौटुंबिक वादातून एका गरोधर विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत महिलेच्या पोटातील 6 महिन्याच्या अभ्रकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी पती अनिल चौरसियाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी अनिल चौरसिया हा आपल्या पत्नीसोबत कळव्यातील मफतलाल कॉलनीत राहत होता. काही महिन्यांनंतर त्याने डोंबिवलीतील निहारिका नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेऊन दुसरा विवाह केला. याबाबत मे महिन्यात पहिली पत्नी शोभावती हिला कळल्यानंतर दोघा पती पत्नीचे नेहमीच वाद होऊ लागले. त्यानंतर करवाचौथ सणाला आरोपीची दुसरी पत्नी निहारिका आरोपीच्या घरी आली आणि पहिली पत्नी शोभावतीला आम्ही लग्न केलं असल्याचं सांगितलं. ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजताच त्यांच्यात आणखी जोरदार वाद होऊ लागले. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपीने पहिल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत पीडित पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर महिलेच्या गर्भातील 6 महिन्याच्या गर्भाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. कळवा पोलिसांनी तात्काळ आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.