पुणे जिल्हात 'दृश्यम’ स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेह हातभट्टीत जाळून खाक.
पुणे जिल्हात 'दृश्यम’ स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेह हातभट्टीत जाळून खाक.

पुणे जिल्हात ‘दृश्यम’ स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेह हातभट्टीत जाळून खाक.

             ==== मुख्य मुद्दे ====
● पुणे जिल्हात पत्नीच्या प्रियकराची निर्मून हत्या.
● मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळला.
● हिंजवडी पोलीस सटेशनच्या हद्दीतील घटना.

पुणे जिल्हात 'दृश्यम’ स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेह हातभट्टीत जाळून खाक.
पुणे जिल्हात ‘दृश्यम’ स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेह हातभट्टीत जाळून खाक.

मिडिया वार्ता न्यूज ब्युरो✒
पुणे,दि.4 नोव्हे:- पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवडमधुन एक धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली आहे. आपल्या पत्नी बरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने आपल्याच पत्नीचा प्रियकराची निर्मुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पत्नीचा प्रियकराचा मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून पुर्णत जाळण्यात आला. पोलिस प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस सटेशनच्या हद्दीतील बावधन येथे हा खळबळ उडवुन देणारा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण.
माघील काही दिवसांपासुन आपल्या पत्नीचे एक व्यक्ती बरोबर अवैध संबंध असल्याचा संशन पतीला होता. त्यामूळे पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्णपणे जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळ असलेल्या नाल्यात टाकला. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल. मात्र हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तिघा जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपी लंकेश रजपुत उर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन तानाजी रजपुत यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिपरी चिंचवड जवळ असलेल्या बावधन येथील भूषण चोरगे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी भरत याने महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले. त्यावेळी जवळ असलेला पती चिडला आणि त्याने विचारणा करत त्या महिलेला मारहाण सुरु केली. ही मारहाण सुरू असताना त्या महिलेने घरामधून पळ काढला.
त्यावेळी महिलेशी संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर असलेला भूषण चोरगे हा महिलेला भेटण्यासाठी घराजवळ आला. मात्र भरत चोरगे तिथे आल्याचं समजताच महिलेच्या पतीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

भरतचा मृतदेह चारचाकी वाहनातून उरवडे गावामध्ये असलेल्या हातभट्टीमध्ये दोन दिवस जाळला. भरतचा मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातील नाला आणि नदीत टाकून पुरावा नष्ट केला. त्यानंतर मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.

दरम्यान भूषण चोरगेच्या कुटुंबीयांनी हिंजवडी पोलिसांत तो मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्याच दिवशी भरत चोरगे याच्या आईला त्याची चप्पल आरोपी लंकेश राजपूत याचा घराजवळ दिसली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे ही लंकेश राजपूतकडे वळवली असता तपासात ही घटना समोर आली. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी हा घटनाक्रम सांगितला. त्यामध्ये ज्यावेळी मयत भूषण चोरगेला दारुच्या भट्टीमध्ये जाळलं, त्यावेळी त्याची हाडं आणि भूषण चोरगेच्या पायामध्ये काही वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड टाकून दिलेल्या ठिकाणावरुन आरोपीनी दिला. तो हस्तगत करत पोलिसांनी त्यानुसार अधिक तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here