श्री प्रभुरामचंद्र दिग्विजय यात्रेचे इंदापूर येथे जोरदार स्वागत.

45

श्री प्रभुरामचंद्र दिग्विजय यात्रेचे इंदापूर येथे जोरदार स्वागत.

श्री प्रभुरामचंद्र दिग्विजय यात्रेचे इंदापूर येथे जोरदार स्वागत.

संतोष  मोरे
इंदापूर विभाग प्रतिनिधी
7744812027

इंदापूर : – अयोध्या ते कन्याकुमारी असा प्रवास करणाऱ्या श्री प्रभुरामचंद्र दिग्विजय यात्रेचे इंदापूर नगरीत जल्लोषात व भव्य स्वागत करण्यात आले.
या वेळी अयोध्येतील भव्य राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या रथाचे इंदापुरात सायंकाळी अगमन होताच फटाक्याच्या आतिषबाजीत सर्व इंदापूर ग्रामस्थ, महिला मंडळ, व बालगोपालांनी स्वागत केले. या वेळी प्रभुरामचंद्र व सीतामातेच्या मूर्तीचे ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंचा सौ. रोशनी राजेंद्र नवगणे, रा.जि. प. सदस्य सौ. स्वाती अनिल नवगणे, उपसरपंच समीर मेथा व सर्व उपस्थित ग्रामस्थ व महिला मंडळींनी पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी मानवसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपचे सदस्य रवी पांडे , हेमंत बारटक्के, अविनाश मेथा, भरत जोशी, पारस माळी, संजय जाधव, प्रशांत मेहता, राजेश संसारे, अमित ओसवाल यांनी नियोजनात पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यात्रेच्या आयोजनासाठी सचिन नवगणे, पारस मल श्री हनुमान व गणेश मंदिर संस्था विस्वस्थ यांनी बॅंनर ,चहा पाणी, पेढे तर अनिता महेंद्र मेथा, रेखा प्रमोद मेथा यांनी सुबक असी रांगोळी रेखाटन करून सहकार्य केले.