पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सीसी टिव्‍ही कॅमेरे संदर्भात सायबर, पोलिस विभाग व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्‍यासोबत चंद्रपूर भाजपाची बैठक संपन्‍न

51

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 3 नोव्हेंबर

महानगराच्‍या सुरक्षीततेच्‍या दृष्‍टीकोनातुन तसेच गुन्‍ह्यांवर नजर ठेवण्‍याच्‍या अनुषंगाने मनपा प्रशासनाने शहरातील काही मोक्‍याच्‍या चौकात सीसी टिव्‍ही कॅमेरे बसविले होते. मात्र यामधील काही कॅमेरे बंद असल्‍याचे समजताच भाजपा महानगर चंद्रपूर शाखेच्‍या वतीने पदाधिका-यांची तात्‍काळ बैठक घेवून कॅमे-यांबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्टीने बैठक संपन्‍न झाली. राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सायबर विभाग, पोलिस विभाग व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्‍यासोबत चंद्रपूर महानगर भाजपाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, भाजपा महानगर उपाध्‍यक्ष सुरज पेदुलवार, भाजयुमो महामंत्री प्रज्‍वलंत कडू, सुशांत शर्मा यांच्‍यासह यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. या बैठकीत चंद्रपूर शहरातील सर्व कॅमे-याचे सर्व्‍हे करून डीपीआर तयार करणे, सद्यःस्थितीत बंद असलेले कॅमेरे तात्‍काळ दुरूस्‍त करणे, हायवे रस्‍त्‍यावर दुर्घटनेमध्‍ये तुटलेले व खराब झालेले कॅमेरे बदलविणे, त्‍याचप्रमाणे चंद्रपूर महानगरपालिका व पोलिस विभागाच्‍या संयुक्‍त सहकार्याने शहरातील बंद स्थितीत असलेले कॅमेरे तात्‍काळ दुरूस्‍त करण्‍यात येतील. सद्यःस्थितीत असलेले कॅमेरे फार जुने झाले आहे. त्‍यामुळे नविन प्रोजेक्‍ट तयार करून त्‍याठिकाणी नविन कॅमेरे बसविण्‍यात येतील. यासंबंधी पुन्‍हा बैठक घेवून चंद्रपूर शहरातील सर्व कॅमेरे सुस्थितीत करण्‍यात येतील असे या बैठकीदरम्‍यान ठरविण्‍यात आले.